अंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात वसईतील दोन उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे

वसई (वार्ताहर) : कलाकारांना प्रोत्साहित करणाऱ्या आर्ट टाईम्स ह्या संस्थेने मुंबईतील जहाँगीर कलादालन भरविलेल्या चित्रकला व शिल्पकला प्रदर्शनासाठी वसईतील ज्योती चौधरी-मलिक व संजय म्हात्रे यांच्या चित्रांची निवड करण्यात आली आहे
आपल्या चित्रातून स्त्री विषयक विविध भाव, भावना नेहमीच चित्रित करणाऱ्या ज्योती चौधरी यांनी  ह्यावेळी पार्वती ,लक्षमी ह्या देवतांना सर्वसामान्य स्त्री च्या रूपात चित्रित केले आहे तर संजय म्हात्रे यांनी वेद व उपनिषदातील मंत्रांना कॅलीग्राफी व विविध आकारांच्या रचनांनी चित्रित केले आहे. देश-विदेशातील जवळपास पन्नासच्यावर कलाकार यात सहभागी आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती अजयकांत रुईया ,आर्किटेक्ट देवांग देसाई ,ऍड गुरू भरत दाभोळकर यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मुंबई येथील जहाँगीर कलादालन २७ ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: