अत्यावश्यक उद्योगांनी त्यांचे कार्य चालू ठेवावे – जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि ९ : जे उद्योग जनतेच्या आरोग्याशी तसेच अत्यावश्यक श्रेणी मध्ये समाविष्ट आहेत अशा उधोगाणी त्यांचे दैनंदिन काम चालू ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. अन्न व त्याच्याशी निगडीत उदयोग , साखर , दूध, जनावरांचे खादय व चारा, औषध निर्माण उदयोग व त्यांचे अधिकृत विक्रेते व त्यांचा वाहतूक करणारे जसे की लस, सॅनिटायझर, साबण, पावडर, मास्क, वैद्यकिय उपकरणे व त्याचे भाग आणि त्यांच्या संलग्न सेवा अखंडीत उत्पादन करणारे उदयोग यांना लॉकडाऊन मधून वगळण्यात आले होते अशा उदयोगांना कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही. हे उदयोग पुन्हा सुरु करणे किंवा उत्पादन चालू ठेवण्यासाठी लेखी अथवा ईलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या परवानगीची गरज नाही या बाबतची अधिसूचना लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

वेअरहाऊस, स्टॉकिस्ट, घाऊक व किरकोळ विक्रेते यांना वस्तुंच्या वाहतूकीसाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे. वाहतूकीसाठी स्वयंघोषणापत्र वाहनावर चिकटवणे पुरेसे आहे. वरील उदयोगांनी अंतर्गत निर्जंतुकीकरण, सुरक्षीत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक बाबींची काळजी घेवुन कमीत कमी कर्मचाऱ्यांसह उदयोग सुरु ठेववावे उदयोगांना पॅकेजिंग पुरविणाऱ्या सर्व उदयोगांनाही त्यांचे उदयोग चालू ठेवता येनार आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.
वरील सर्व उदयोगांना कच्चा माल पुरविणाऱ्या कंपन्यांनाही त्यांचे उदयोग चालू ठेवण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर कच्चा माल पुरविण्यात येणाऱ्या कंपन्यांची यादी ही संबंधीत उत्पादकाकडे दिनांक ०३/ ०४/२०२० पुर्वी असावी. कच्चा माल पुरवठादारांनी अटीचा भंग केल्यास त्याचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!