अनधिकृत जाधव मार्केटमधील गाळे जमीनदोस्त 

वसई (वार्ताहर) : आगीच्या भक्षस्थानी पडलेले आणि प्रवासी,रहिवाशांसह विद्यार्थ्यांनाही धोकादायक ठरु पाहणारे अनधिकृत जाधव मार्केट जमीनदोस्त करण्यात आले आहे.

तारखेला पहाटे नालासोपारा पुर्वेकडील जाधव मार्केटला आग लागली होती.रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या या मार्केटमध्ये एकूण ३३ गाळे आहेत.दुतरर््फा असलेल्या या गाळयांच्या मध्ये असलेल्या चिंचोळया बोळातून लाखो प्रवासी दररोज रेल्वे स्थानकात ये-जा करीत असतात.तसेच या मार्केटला लागूनच तीन रहिवासी इमारती आणि समर फिल्ड शाळा आहे.कोणतीही परवानगी न घेता हे मार्केट अनधिकृतपणे सुरु आहे.त्यात चहाच्या टपरीपासून चायनीज जेवणापर्यंत सर्व खाद्य पदार्थांच्या टपऱ्या आहेत.या टपऱ्यांमध्ये घरगुती सिलेंडरचा अनधिकृतपणे वापर केला जातो.तसेच विजेचीही चोरी केली जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची श्यता लक्षात घेवून हे मार्केट जमीनदोस्त करण्याची मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय मीणा यांनी आयुक्त बी.जी.पवार यांच्याकडे केली होती.

हे मार्केट बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अरुण जाधव आणि त्यांचे सहकारी अनधिकृतपणे चालवत आहेत.त्यामुळे आगीच्या दुर्घटनेची जबाबदारी जाधव यांच्यावर निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि महापालिकेच्या वतीने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणीही करून कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही मीणा यांनी दिला होता.

अखेर काल सकाळी हे मार्केट महापालिकेने जमीनदोस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!