अपंग व्यक्तींसाठी ठेवण्यात येणाऱ्या ३% निधीचे नियंत्रण समिती मध्ये देविदास केंगार यांची सदस्य पदी नियुक्ती

वसई : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निसमर्थ (अपंग) व्यक्तींसाठी ठेवण्यात येणाऱ्या ३% निधीचे नियंत्रण समिती मध्ये पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.विष्णूंजी सावरा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांची पालघर जिल्हा स्तरावर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अपंग दिव्यांग व्यक्तीस (समान संधी ,हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील कलम ४० नुसार दारिद्र्य निर्मूलन योजनेमधील लाभधारकांमध्ये किमान ३% निसमर्थ अपंग लाभार्थी असावेत अशी तरतूद आहे.सदर तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याच्या एकूण उत्पन्नाच्या ३ टक्के निधी निसमर्थ (अपंग)दिव्यांग लाभार्थ्यच्या / अपंगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवणे तो खर्च करणे बंधनकारक आहे.सदर निधी विविध स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत राखून ठेवण्यात येत आहे.तथापि यामधून निसमर्थ अपंग व्यक्तिकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांवर खर्च होणाऱ्या निधीचे नियंत्रण करण्याकरिता जिल्हा पातळीवर समित्या गठीत करण्याबाबतचे निर्देश दिले आहे.त्याप्रमाणे पालघर जिल्हा पातळी वर पालघर जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये ३ टक्के निधीचे नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.या समिती मध्ये या समितीचे अध्यक्ष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णुजी सावरा आहेत.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णूंजी सावरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्थरावरील स्थानिक स्वराज्य संस्था काढून अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ३ टक्के निधीचे नियंत्रण समितीमध्ये अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांची पालघर जिल्हा स्तरावर  सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!