अमेय क्लबच्या क्रिकेट अकादमीतील ३ मुलींची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड

विरार : क्रीडाप्रेमी नेते,माजी महापौर राजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या अमेय क्लासिक क्लब या संस्थेच्या क्रिकेट अकादमीतील ३ मुलींची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्यांचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी आज ही माहिती दिली.
कु.जान्हवी काटे, जाग्रवी पवार आणि रिया चौधरी या क्रिकेटपटू मुलींची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने या तिघिंची या आधी निवड केली होती. आता या तिघिंची २३ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. अमेय क्लासिक क्लबच्या वतीने  क्लबचे अध्यक्ष व वसई-विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी या तिघी आणि प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांचे विरार येथे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस त्यांनी या गुणी क्रिकेटिअर्सना शुभेच्छा दिल्या.
इथे हे उल्लेखनीय आहे की पिंगुळकर यांचा विद्यार्थी पृथ्वी शाॅचे खणखणीत दीड शतक कालच आंतरराष्ट्रीय सामन्यात झळकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: