अमेय क्लबच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदणी करण्याचे तरुणांना आवाहन

विरार (प्रतिनिधी) : येथील अमेय क्लासिक क्लबच्या वतीने दरवर्षी पोलीस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या सीझनचे प्रशिक्षण शिबीर लवकरच सुरू होणार असून या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे नोंदवावीत आणि या संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन पालघर जिल्ह्यातील युवक, बेरोजगार तरुणांना अमेय क्लबच्या वतीने अध्यक्ष व प्रथम महापौर राजीव पाटील यांनी केले आहे. युवती व विद्यार्थिनींनी सुध्दा या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असेही हे आवाहन आहे.

आजवर अनेक युवक -युवतींनी अमेय क्लबच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन ते पोलीस, इंडियन आर्मी, आर.पी.एफ.दल जॉईन केले आहे. आजही अनेक जण येथे तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.अगदी गरीब आणि गरजू तसेच होतकरू विद्यार्थ्यांना, तरुणांना तर हे शिबीर मोफत देण्याची सोयही अमेय क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अनुभवी प्रशिक्षक सुनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. नियमित व्यायाम, सराव बौध्दिक क्षमता आणि पोलीस खात्याला अपेक्षित असलेली गुणवत्ता शिवाय ‘सराव भरती’ असे या शिबीराचे स्वरुप असते. तर शारिरीक कसरत, ए.बी.सी.ट्रेनिंग,वॉटर ट्रेनिंग, मंकी जंप, डक जंप, कांगारु जंप, हरण उडी असे नेहमीचे प्रकार प्रशिक्षणात समाविष्ट आहेत.

या संदर्भात अधिक माहिती साठी संपर्क साधावा. सुनिल राठोड -7776946172, सूरज वसावे – 9860594808.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!