अमेय पोलीस भर्तीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे मोफत प्रशिक्षण सत्र सुरु

विरार : ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमेय क्लासिक क्लबचा खास तरुण-तरुणींना लाभदायक असा उपक्रम म्हणजे
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
दहावी, बारावी आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण होताच पुढे काय करावे याचा विचार करत न बसता तरुणांनी हमखास नोकरी मिळाली पाहिजे असे आणखी शिक्षण व प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन या अमेय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
देशाला व राज्याला उत्तम आणि खडतर प्रशिक्षण घेतलेल्या, तरुण व सशक्त पोलीसांची गरज आहे. आणि असे पोलीस घडविण्याचे कार्य कोणत्याही प्रकारच्या मोबदल्यात न घेता म्हणजेच मोफत करणारी अमेय क्लासिक क्लबच्या वतीने करण्यात येते.
या प्रशिक्षण शिबिरात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, अशा युवक-युवतींनी आपल्या नावांची रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे काम उद्या ८ जून पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षण काळात सी.आर. पी.एफ. आणि बी.एस.एफ. या भरतीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अत्यावश्यक असते ते प्रशिक्षण त्यातील अनुभवी व तज्ञ प्रशिक्षक  देणारआहेत.
तपशीलवार कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र या प्रशिक्षण काळात मैदानी खेळ व क्षमता वाढ, हिल ट्रेनिंग, वॉटर ट्रेनिंग, डक वॉक, मंकी अँड कांगारु जंप, हरण ऊडी, असे शारीरिक क्षमता व चापल्य व ज्ञानात वाढ होईल अशी ही आखणी आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक, पोलीस भरती प्रक्रिया या क्षेत्रात मोठे कार्य पाठीशी असलेले राठोड सर यांच्या मार्गदर्शना प्रमाणे  शिबीराचे कामकाज होईल. जे जे हे प्रशिक्षण पूर्ण करतील
त्यांना पोलीस विभागाच्या कोणत्याही विभागात नोकरी मिळेल याची खात्री देणारे पालघर जिल्ह्यातील “अमेय विरार” हे एकमेव केंद्र आहे. ज्येष्ठ कामगार नेते आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांनी सुशिक्षित व नवशिक्षित युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या बाबतीत अधिक माहिती साठी संपर्क नंबर आहेत,
राठोड सर -7776946172  आणि
– 9370384371.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!