अयोध्या प्रकरणी “सामना” चे पत्रकार संजय डहाळे यांना समन्स जारी 

मुंबई | योगेश त्रिवेदी
श्रीराम जन्मभूमी अयोध्या (फैजाबाद) प्रकरणी लखनौ येथील विशेष न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक “सामना’ चे तत्कालीन मुख्य वार्ताहर संजय डहाळे यांना सी.बी.आय च्या वतीने समन्स जरी केले आहे. त्यांना न्यायालयात हजर राहून साक्ष द्यावी लागणार आहे. 
अयोध्यातील श्रीराम मंदिर उभारण्याचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच १९९६ च्या अयोध्या श्रीराम जन्मभूमी प्रकरणी पवनकुमार पांडे आणि अन्य व्यक्तींवर निश्चित केलेल्या आरोप संदर्भात जो खटला आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील “सामना” या वर्तमान पात्रातील त्यावेळी मुख्य वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळणारे संजय डहाळे यांना साक्षीदार म्हणून प्रकशित बातम्या व घटना याबद्दल साक्ष द्यावी लागेल. या प्रकरणात पत्रकार डहाळे यांना कलम १२० बी, १४७, ३९५, ३९७, ३३२, ३३८ इत्यादी अन्व्ये हे समन्स जरी करण्यात आले आहे. विशेष अप्पर जिल्हा न्यायाधीश सी.बी.आय च्या वतीने मुंबईत हे समन्स वाजवण्यात आले.
अत्यल्प कालावधीमुळे १७ नोव्हेम्बर रोजी पत्रकार डहाळे यांना उपस्थित राहता येणे नसल्यामुळे ही साक्ष तूर्त न्यायालयाच्या परवानगीने पुढे ढकलली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्थपक, संपादनाखाली सुरु झालेल्या “सामना” दैनिकात पहिल्या दिवसापासून पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. पंचवीस वर्षपूर्वी घडलेल्या अयोध्या प्रकरणी घटनांच्या बातम्या व छायाचित्रे प्रमुख वार्ताहर या नात्याने शहानिशा करून प्रसिद्ध केली आहेत. शिवसेनाप्रमुखांचे संपादक म्हणून मार्गदर्शन वेळोवेळ लाभले यासाठी मी “सामना” चा पत्रकार म्हणून भाग्यवान आहे , अशी प्रतिक्रिया डहाळे यांनी याबद्दल प्रकट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!