अयोध्येतील कार्यक्रमाची शिवसेनेची जोरदार तयारी ; एक लाख शिवसैनिकांसाठी रेल्वेचे आरक्षण

मुंबई (जयंत करंजवकर) : अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचा प्रत्यक्ष मुहूर्त २४ नोहेंबर पासून होणार आहे. यादिवशी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीवर पूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून एक लाख शिवसैनिक अयोध्येत उपस्थित राहण्यासाठी फैजाबाद, अयोध्या, कामियानी, गोंडा एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी सेना नेत्यांवर तसेच विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अयोध्यातील सभेची तयारी करण्यासाठी शिवसेना भवन गजबजून गेले आहे.

लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊनही पाच वर्षात राम मंदिर उभारण्यावर भाजपाने एक अवाक्षर काढले नाही.  मात्र सेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरसाठी अयोध्यात जाण्याची घोषणा केली आणि देशात त्याचे परिणाम होऊन भाजपा आणि हिंदू संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाग आली.
त्यामुळे राम मंदिर प्रश्नाचे श्रेय शिवसेनेकडे जाऊ नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आयोध्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे हे २५ नोहेंबर
ला अयोध्येत सभा घेऊन हिंदू बांधवांना संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे यावेळी हिंदीतून भाषण होणार आहे, त्यासाठी काही हिंदी भाषिक तरुण शिवसैनिक त्यांच्या भाषणाची तयारी करीत आहेत. शिवतीर्थावर ‘माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि माता, पितांनो…’ अशी भाषणाची सुरुवात असते त्याच प्रमाणे हिंदीतून ‘मेरे तमाम हिंदू भाईयो, बहने  और माता, पिताओ ‘ याप्रमाणे सुरवात होणार असून केंद्र सरकार इतर प्रश्न लोकसभेत आणून विधेयक संमत करते तर राम मंदिर उभारणीचा प्रश्न लोकसभेत का आणत नाही असा सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकप्रकारे आव्हान करणार असल्याचे सूत्राकडून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!