अर्नाळा बीचवर रंगली साहित्य चावडीची काव्यसंध्या

विरार : आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या यंग स्टार्स ट्रस्ट चा उपक्रम म्हणून काम करणाऱ्या साहित्य चावडीची या महिन्याची काव्यसंध्या काल अर्नाळा समुद्र किनारी सुरच्या बागेत चांगलीच रंगली. प्रा.सुनंदा कांबळे ,दीवा यांनी या मैफलीचे अध्यक्षपद भूषविले.

 ‘या कोळीवाडयाची शान आई तुझं देऊळ’ या गीताचे कवी प्रदीप पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कविसंमेलनात सहभागी झाले होते. जम्मू काश्मीर श्रीनगरला शहीद झालेल्या जवानांना आणि ज्येष्ठ साहित्यिक नामवर सिंह यांच्या निधनानिमित्ताने सुरुवातीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

नगरसेविका रंजना थाळेकर, पंचायत समिती सदस्य ज्योति कुडू यांचीही उपस्थिती होती. सुहास राऊत,  (डहाणू) महेंद्र पाटील (केळवे) राजेंद्र चौधरी (बोरीवली) सुभाष राजगुरु (उल्हास नगर) कल्पना म्हापूसकर, (मीरा रोड) डॉ. के.डी.संख्ये, (पालघर) गझलकार ज्योती बालिगा राव, प्रा.महादेव इरकर, ऐड्.नेहा धारुळकर, उज्वला मुदप्पू,हेमांगी शासने, संगीता पाध्ये, प्रीता पाटील,मीना ठाकोर, सुप्रिया घोरपडे, विक्रांत केसरकर, मधुकर तराळे, लक्ष्मण शेडगे, अमोल घवाळी,राधा ओझा, आसिफ अ.देशमुख, शिवानी अनगोळकर, चंद्रकांत धोंडे,विद्या गिरीधर,शुभम केसरकर,किशोरी पाटील या वसई तालुक्यातील कवी-कवयित्रींनी या वेळी काव्य वाचन केले. प्रा.सुनंदा कांबळे, ज्योति बालिगा, प्रदीप पवार, डॉ.के.डी.संख्ये यांच्या कवितांना उस्फुर्त अशी दाद मिळाली.

चावडीचे प्रमुख प्रा.विजय उमर्जी, कवयित्री नगरसेविका सुरेखा कुरकुरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सरपंच प्रा.सुनंदा कांबळे यांनी साहित्य चावडी या उपक्रमाचे कौतुक व सहभागी कवींचे कौतुक आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

या काव्यसंध्येचे सूत्रसंचलन नाटय लेखक व को.म.सा.प. नालासोपारा शाखेचे अध्यक्ष रमाकांत वाघचौडे यांनी केले. सुरेखा कुरकुरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!