अवास्तव बिल दुरुस्तीसाठी ग्राहकांची झुंबड

वसई (वार्ताहर) : भरमसाठ आलेल विज बिल दुरुस्त करण्यासाठी विरारमधील नागरिकांनी तुडुंब गर्दी केल्यामुळे कोरोना संकटात सुरक्षीत अंतराचे तीनतोरा वाजले आहे.

गेल्या तीन महिन्यात आलेले विजबील ऑनलाईन भरले असतानाही वसई तालु्यातील हजारो ग्राहकांना भरमसाठ बीले पाठवण्यात आली आहेत.आधीच रोजगार गेलाय,त्यात उपासमार आणि आता भरमसाठ बिल आल्यामुळे भयभीत झालेल्या ग्राहकांनी विरारच्या महावितरण कार्यालयावर बील दुरुस्तीसाठी तुङ्खान गर्दी केली होती.त्यांना आवरण्यासाठी पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे पोलीसांकडेच ग्राहकांनी आपले गाऱ्हाणे मांडले.बीले भरलेली असतानाही महावितरणाने तीन महिन्यांचे एकत्रित बील पाठवल्यामुळे युनीटचा दर साडेतीन रुपयांऐवजी आठ रुपयांवर गेला. परिणामी पाचशे रुपयांचे नियमीत बील चौपट आले आहे.

ग्राहकांच्या तक्रारीवर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमचे बील योग्य असल्याचे सांगून पिटाळून लावले.तर आधी बील भरा नंतर बघु असे चाकोरीबध्द उत्तर देवून त्यांना निरुत्तर केले.त्यामुळे बीलाची रक्कम कुठून आणायची असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे.तीन महिन्यांच्या बेरोजगारीतून ग्राहक कसेबसे सावरत आहेत.त्यांच्या रोजगाराला आता सुरवात झाली आहे.त्यामुळे त्यांची बीले माङ्ख करावीत अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केली आहे.तर आधी त्यांची बीले आधी दुरुस्त करा.त्यांना स्लॅब बेनीङ्खिट द्या आणि टप्प्या टप्प्याने बील भरायची संधी द्या.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल डिसील्वा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: