अष्टपैलू क्रिकेट पटुच्या मृत्युने हळहळ

विरार : विरारमध्ये एका अष्टपैलू क्रिकेटपटने आईसह राहत्या घरी आत्महत्या केली. या मायलेकाने विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असं २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे तर सरस्वती प्रकाश चौगुले असं ४२ वर्षीय आईचं नाव आहे. हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने राहत होते.
या दोघांचे मृतदेह काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घरात आढळून आले. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन आत्महत्येच्या कारणाचा तापस सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!