आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वसई-विरारमधील मुला-मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

वसई (वार्ताहर) : बँकाँक (थायलॅण्ड) येथे झालेल्या वर्चुअल युथ फेस्टीवल २०२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वसई-विरारच्या तब्बल ११ खेडाळूंची निवड झाली असून आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली ही मुले मागे राहिलेली नाहीत. परंतु या कोरोना काळात देखील या मुलांनी आपली जिद्द सोडली नाही.

११ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळात झालेल्या (युटीएस) युनायटेड थ्रु स्पोट्स आयोजित वर्चुअल युथ स्पोर्ट्स फेस्टीवल २०२० या स्पर्धेमध्ये पात्रता चाचणी पार करून स्पर्धेत उतरण्यासाठी या मुलांनी आपली जागा कायम केली. या स्पर्धेत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धकांनी राज्य व राष्ट्रीय टुर्नामेंट्समध्ये भाग घेऊन विजयी होऊन मगच ही सर्व मुले या टप्प्यात पोहचली. या वर्चुअल युथ स्पोर्ट्स फेस्टीवल २०२० साठी जगभरातील १२ विविध देशांतील मोठ्या संख्येने मुला-मुलींनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेन्टमध्ये मुलांनी भाग घेतला होता. एक म्हणजे म्युजिकल फॉर्म तर दुसरा क्रियेटीव्ह टिम फॉर्म. यातील म्युजिकल फॉर्म मध्ये वसई-विरारची ११ मुले व क्रियेटिव्ह फॉर्म मध्ये दोन टिम गेल्या होत्या.सदर स्पर्धेमध्ये भारतीय संघातून २५ जणांची निवड झाली होती. यात सर्वात महत्वाची व अभिमानाची बाब म्हणजे २५ जणांपैकी ११ मुले आपल्या वसई-विरारची असून ही सर्व वसईतील लर्न फॉर्म द मास्टर (एलएफएम) या क्लासेसची आहेत. या क्लासचे प्रशिक्षक सुर्यप्रकाश मुंडापाट सर यांनी सर्व मुलांच्या मागे पुर्ण पेनडॅमिक काळात ऑनलाईन क्लासेस घेवून खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी सर्व स्पर्धकांकरिता घेतलेल परिश्रमामुळेच हे स्पर्धक यश संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, भारताने जिंकलेल्या ४ सुवर्ण, ५ रजत व १० कांस्य अशा एकूण १९ पदापैंकी ३ सुवर्ण, २ रजत व ८ कांस्य अशई एकूण १३ पदके (एलएफएम) क्लासच्या मुलांनी पटकावली आहेत. जगभरातून भारताला तिसर्‍या क्रमांकावर आणण्यात आपल्या या चिमुकल्यांचा खूप मोठा वाटा आहे. या सर्व स्पर्धकांंच्या मागे मेहनत घेणारे व नेहमी पडद्याआड असणारे सिद्धांत मुंडापाट व सायली कानहत हे त्यांच्या पाठिशी नेहमीच होते. या संपूर्ण इव्हेंट मध्ये मोलाचे सहकार्य करून मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देणार्‍या संतोष अग्रवाल सर (वाको इंडिया प्रेसीडेन्ट) व निलेश शेलार सर (वाको महाराष्ट्र प्रेसीडेन्ट) यांचे सर्वच र्स्धक व प्रशिक्षक आभारी आहेत.

या स्पर्धेमध्ये १० ते १८ वर्षांखालील मुला-मुलींनी भाग घेतला होता. यामध्ये शौर्य मुंडापाट 1 सुवर्ण, वेल्मा रेमेडीयस 1 सुवर्ण व १ कांस्य, अक्षय महाजन १ सुवर्ण व १ कांस्य, धैर्य अहिरे 1 रौप्य, राहुल कुबत्तीया १ रौप्य व १ कांस्य, मयुरेश चौगुले १ कांस्य, मयुर सालगावकर १ कांस्य, अग्रीमा देवलाल २ कांस्य, प्रिती पाटील १ कांस्य, सानवी चौधरी हिचा ४था क्रमांक तर भार्गवी मोहिते हिने ५वा क्रमांक पटकावला आहे. तसेच क्रियेटीव्ह टिम फॉर्मच्या विजेत्यांमध्ये टिम १ वेल्मा रेमेडीयस व अग्रीमा देवलाल यांना कांस्य पदक मिळाले तर टिम २ अक्षय महाजन व राहुल कुबत्तीया यांनीही कांस्य पदक पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांवर वसई तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!