आगरी सेना पालघर जिल्हा प्रवक्ते पदी भुपेश कडूलकर यांची निवड

विरार ( वार्ताहर) : आगरी सेना नेते श्री. प्रदीपभाऊ  साळवी व आगरी सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री मेघनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्हा आगरी सेनेची सभा गुरुवारी संपन्न झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक विषयावर तसेच आगरी सेनेने हाती घेतलेल्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच आगरी सेनेच्या आगामी धैर्य व धोरणाविषयी आगरी सेना नेते श्री कैलास पाटील आणि पालघर जिल्हा अध्यक्ष श्री जनार्दन पाटील (मामा) यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना माहीती दिली.

यावेळी आगरी सेना वसई तालुका विद्यमान अध्यक्ष भूपेश कडूलकर यांना पालघर जिल्हा कार्यकारिणीवर पदोउन्नती देत त्यांची आगरी सेना पालघर जिल्हा प्रवक्ता पदी निवड करण्यात आली. याविषयी बोलताना आगरी सेना नेते कैलास पाटील यांनी आगरी सेनेच्या माध्यमातून आज जिल्हा, तालुका, गाव पातळीवर अनेक सामाजिक विषय हाती घेतले आहे. गावागावात मोठया प्रमाणात आगरी सेनेत कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत आहे, तसेच निवडणुकीचे दिवस येत आहेत, अशा प्रसंगी प्रसारण मध्यामांसमोर कोणतेही भाष्य करताना अथवा वर्तमान पत्रात बातमी देताना काळजी घ्यावी लागणार आहे. आज आगरी सेना पालघर जिल्हा प्रवक्ता म्हणून निमणुक करण्यात आली आहे. प्रवक्ता व्यतिरिक्त किंवा प्रवक्ताच्या सहमतीशिवाय कोणीही यापुढे कोणत्याही tv, youtube चॅनल अथवा news paper मध्ये आपले मत व्यक्त करू नये असे सांगितले.

याप्रसंगी नवनिर्वाचित प्रवक्ता श्री भूपेश कडूलकर यांनी आगरी सेनेच्या कार्याचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव देत आपण संघटनेच्या सामाजिक कार्याला बलकटी देऊन, जिल्हा पातळीवरील विविध विषयावर लक्ष केंद्रीय करुन प्रसारण मध्यामासमोर आपली योग्य भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!