आगामी काळ शिवसेनेचाच – आ.फाटक

वसई (वार्ताहर) :  2019 साल निवडणूकीचे वर्ष असून,लोकसभा,विधानसभा आणि महापालिकेत शिवसेनाच असेल.असा आत्मविश्वास पालघरचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी शिवसैनिकांना दिला.

नालासोपारात शिवसैनिकांच्या मेळाव्याच्या शनिवारी रात्री आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण,कोकण पाटबंधारे विकास मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,मिलींद खानोलकर,श्रीनिवास वनगा,मौलाना कुरेशी,प्रभाकर भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शहरप्रमुख संतोष टेंबवलकर यांनी या मेळाव्याचे प्रास्ताविक केले.आगामी महापालिका निवडणूकीत आपल्या शहरातील 16 पैकी 12 जागा लढवण्याची त्यांनी यावेळी हमी दिली.नालासोपारा विधानसभा सहसंघटक जितेंद्र शिंदे यांनी या मेळाव्याचे सुत्रसंचालन केले.

यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम तावडे आणि मौलाना कुरेशी यांच्यासह अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.जातपात न मानणारा हा पक्ष आहे.कोणत्याही समस्या असल्या तर पुढच्या मिनीटाला हाकेला धावून येणारे शिवसैनिक या पक्षात आहेत.त्यामुळे मुस्लीम बांधवांनी संकोच न करता शिवसेनेत सामील व्हा.आपल्या घरावर भगवा फडकवा.असे आवाहन यावेळी मौलाना यांनी यावेळी केले.तर दंगलीच्या वेळी हिंदुंचे रक्षण करणारे मुस्लीम फक्त शिवसेनेतच मिळतील.असे गौरवोद्गार यावेळी शिरीष चव्हाण यांनी काढले.

शिवसेनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे आगामी काळ आमचाच आहे.पालघर लोकसभा,विधानसभा आणि वसई-विरार महापालिकेत शिवसेनाच असणार आहे.असा आत्मविश्वास यावेळी आमदार फाटक यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!