आगार व्यवस्थापकाने रॉडने केली चालकाला मारहाण

वसई (वार्ताहर) : डयुटी लावण्यावरून झालेल्या वादातून नालासोपारातील आगार व्यवस्थापकाने चालकाला रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून,गंभिर जखमी झालेल्या चालकावर हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

सर्जेराव कंटाळे असे जखमी झालेल्या बसचालकाचे नाव असून,तो नालासोपारा एसटी आगारात कार्यरत आहे.शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्याचा डयुटी ऑफीसर सिमा दांडेकर आणि आगार व्यवस्थापक दिलीप भोसले यांच्याशी वाद झाला होता.त्यात भोसले यांनी कंटाळे यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर रॉडने हल्ला केला.रॉडचा फटका डोळयाच्या खालच्या बाजुला बसल्यामुळे कंटाळे गंभिर जखमी झाले.त्यांना निर्मळ येथील श्रध्दानंद हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी भोसले आणि दांडेकर यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंटाळे यांनी दारु पिऊन मारहाण केल्याची तक्रार सिमा दांडेकर आणि भोसले यांनी केली.तसेच कंटाळे यांनी विनयभंग केल्याचेही दांडेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे गंभिर जखमी झालेल्या कंटाळे यांच्या विरोधात ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटाळे यांना मारहाण करून जबर जखमी केल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे आगारातील कर्मचारी संतप्त झाले असून,कंटाळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी डेपो बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!