आदित्य ठाकरे, आपण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, याची जाणीव आहे काय ?

मुंबई, दि.२९  (विशेष प्रतिनिधी) : ठाकरे खानदान च्या चौथ्या पीढीचे प्रतिनिधी आदित्य उद्धव ठाकरे हे आजमितीला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याची त्यांना जाणीव आहे काय ? असा संतप्त सवाल घर हक्क समितीच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर यांनी केला. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेची पदे भोगली नाहीत. त्यांनी सदैव लालदिव्याच्या गाड्या कार्यकर्त्यांना मिळवून दिल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज विशिष्ट परिस्थितीत मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. त्यांना विधिमंडळाच्या एका सभागृहात निवडून यावे लागणार आहे. पण उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे वरळी येथून सचिनभाऊ अहिर यांच्या सल्ल्याने सुनील शिंदे यांना बाजूला ठेवून विधानसभेत निवडून आले. सचिनभाऊ यांना उपनेतेपदाची बक्षिसी सुद्धा मिळाली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून घेत असलेल्या प्रत्येक बैठकांमध्ये आदित्य ठाकरे उपस्थित रहात असत म्हणून आक्षेप घेण्यात आले, तेंव्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊन आदित्य ठाकरे यांना पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती सोपवून मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांना उत्तर देत घटनात्मक पद आदित्य ठाकरे यांना मिळवून दिले. इतकेच नव्हे तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील पालकमंत्री पद सुद्धा दिले. आता उद्धव ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक होत असतांना आदित्य ठाकरे यांना “हीच वेळ आहे, करुन दाखविण्याची” मुंबई उपनगरात वांद्रे पासून दहिसर आणि मुलुंडपासून कुर्ला आणि चेंबूर, नव्या मुंबई पर्यंत विविध भागांना भेटी देत प्रशासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घरोघरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी उद्युक्त करता येईल आणि स्वतः सुद्धा टीकेचे धनी न होता कौतुकास्पद काम करीत असल्याचे महाराष्ट्रातील सर्व जनतेला दाखवून देता येईल, खुषमस्कऱ्यांना बाजूला ठेवून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना सोबत घेऊन कोरोना वर मात करण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असा सल्ला सुद्धा मोहिनी अणावकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!