आदिवासी एकता परिषदेचे वक्तव्य ; एकलव्याचा अंगठा घेतला तेंव्हाच आम्ही धनुष्यबाण तोडले

वसई (वार्ताहर) : ज्यावेळी एकलव्याचा अंगठा घेण्यात आला त्याचवेळेपासून आम्ही धनुष्यबाण तोडले.असे स्पष्टीकरण आदिवासी एकता परिषदेने नालासोपारातील निर्मळ या पौराणिक भुमीत केले.

भुमीपुत्र पचाव समितीचे उमेदवार दत्ताराम करबट यांची प्रचारसभा शनिवारी सायंकाळी निर्मळ येथे संपन्न झाली.ऍड.नोवेल डाबरे, ऍड.धनंजय चव्हाण, टोनी डाबरे, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळुराम धोदडे,अध्यक्ष दत्ता सांबरे, पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, शशी सोनावणे, मॅकेन्झी डाबरे,वंदना जाधव या सभेला उपस्थित होते.त्यांनी युती आणि महाआघाडीसह महापालिकेतून गावे वगळण्याचा दावा करणाऱ्यांचा यावेळी समाचार घेतला.तसेच युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना बेडुक,पोपट,नंदीबैल,डोबा मेंढरा अशी विशेषणे दिली.

रेशन आणायला गेल्यावर  सरकारने आदिवासींना पोसायला घेतले आहे.असे टोमणे ऐकायला लागतात.रेशनवर मिळणारी डाळ शिजत नाही.रॉकेल बंद करण्यात आले आहे.आणि विजेचा पत्ता नाही.फुकट दिलेल्या गॅस सिलेंडरसाठी आता हजार रुपये भरावे लागताहेत.हे मोदींचे आदिवासींसाठी अच्छे दिन आहेत का असा प्रश्न यावेळी एकता परिषदेच्या उपाध्यक्षा वंदना जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.तर एकलव्याचा ज्यावेळी अंगठा घेण्यात आला,त्यावेळीच आम्ही धनुष्यबाण मोडले असे दत्ता सांबरे यांनी यावेळी स्पष्ट केले.तर बुलेट ट्रेनसाठी एक इंचही जागा देणार नाही असा इशारा यावेळी दत्ता करबट यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!