आपला शेक्सपिअर, ऑस्कर वाईल्ड शोधावा – अभिनेते मकरंद देशपांडे

वसई : नाट्य चित्रपट अभिनेत्यांनी आपल्या मना विरुद्ध या क्षेत्रात वावरू नये आणि मन रमत नाही तिथे राहू नये. आपला मार्ग वेगळा करावा. आता आपण आपला शेक्सपिअर वा ऑस्कर वाईल्ड , चेकॉव्ह शोधला पाहिजे. रंगभूमीवरील नवी दैवतं स्विकारली पाहिजेत.नवे विकल्प नव्या संकल्पना मांडल्या पाहिजेत. नाटक हे मनातलं असतं आणि नाटकातील स्वगत हे लेखकाचे मनोगत असते. जसे वर्तमान पत्रात संपादकीय असते, असे विचार ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांनी काल वसईत बोलताना व्यक्त केले.
येथील ज्येष्ठ रंगकर्मी स्व.नाना वळवईकर यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्ताने अमर कला मंडळाने देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
कॉँग्रेस भवन, पारनाका वसई येथे झालेल्या या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने त्यांचा व ज्येष्ठ प्रकाश योजनाकार शीतल तळपदे यांचा सत्कार करण्यात आला. रंगकर्मी विलास पागार यांनी देशपांडे यांचा परिचय करून देताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अभिनेते मकरंद पुढे बोलताना म्हणाले की, नाटक हे साहित्याचे असे  अंग आहे की ते केवळ वाचायला देता येत नाही तर ते रसिकांच्या पुढे सादर करावे लागते. तेव्हा ते पूर्ण होते. तरुण वयातच मला विजय तेंडुलकरांसारखे महान नाटककार भेटले आणि त्यांनी मला लिहिते केले. तसा मी छान विकेट कीपर बैट्समन होतो. मात्र मग नाटकात रमलो आणि क्रिकेट मागे पडले.नव्या पिढीला मी हेच सांगेन की,
नाटक पाठ नका करू तर ते आत तुमच्या तनामनात घ्या.
 या कार्यक्रमाला रसिकांची गर्दी झाली होती. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक राजीव वेंगुर्लेकर, संतोष वळवईकर, प्रकाश वनमाळी,आशिष भिडे, विजय शिरीषकर, अरविंद कारखानीस, ऐड्.ओंमकार म्हात्रे, ऐड्. देवव्रत वळवईकर, ऐड्.रमाकांत वाघचौडे या मान्यवरांसह विविध नाट्य मंडळांचे, सभासद, साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेकजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या सत्रात मकरंद देशपांडे यांनी रसिकांशी थेट संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!