“आमची वसई”तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात !

धर्मसभा, आमची वसई व स्प्रेडींग स्माईल तर्फे कोल्हापूर – सांगली ला मदत रवाना !

वसई : आमची वसई सामाजिक संस्थेने केलेल्या आवाहनाला जनतेने उदंड प्रतिसाद देत पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक सामुग्री जमा केली. आमची वसईने रोख न स्विकारता वस्तूरूपातच मदत स्विकारली. जमा झालेले साहित्य न्यू इंग्लिश स्कूल, वसई गाव येथे ठेवण्यात आले होते. साहित्याचे टेंपो कोल्हापूर व सांगली ला रवाना झाले आहेत. प्रशासन व आपल्या कार्यकर्त्यांतर्फे योग्य व गरजू लोकांपर्यंत ही मदत लवकरच पोहोचेल असे स्प्रेडींग स्माईल चे गजानन राठोड व निखिल जाधव यांनी सांगितले. 

शाळेने विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापकांचे, दानशूर जनतेचे व दिवसरात्र तन-मनव धन अर्पण करून कर्तव्य भावनेने परिश्रम करणाऱ्या धर्मसभा, आमची वसई व स्प्रेडींग स्माईल च्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे असे मत आमची वसई अध्यक्ष अध्यक्ष पं.हृषीकेश वैद्य यांनी व्यक्त केले.
देव सगळ्यांना सद्बुद्धी देवो, पूरग्रस्त नागरीकांचे जीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येवो व अशी आपदा कोणावरही न कोसळो यासाठी धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: