आमची वसई आयोजित ‘शिव-शक्ती दौड’ संपन्न !

वसई : पारतंत्र्यापूर्वीच्या अखंड भारतात महिला सुरक्षित व सुशिक्षित होत्या. जेव्हा एखाद्या स्त्रीचे अपहरण केले गेले तेव्हा रामायण घडले, जेव्हा एका स्त्रीचा अपमान केला गेला तेव्हा महाभारत घडले. राजमाता जिजाबाईंनी याच रामायण महाभारतातील कथा सांगून शिवबावर संस्कार केले. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्यात जेव्हा महिलेचा विनयभंग केला गेला तेव्हा गुन्हेगाराचा हुद्दा-नाते न बघता महाराजांनी त्याचे हात पाय छाटण्याचे आदेश दिले . माता भगिनींवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या पाश्चिमात्य व म्लेच्छांचा समूळ नायनाट करून पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा शिवरयांसह अनेक तत्त्वनिष्ठ मावळयांनी महादेवाच्या साक्षीने घेतली.

पाश्चिमात्य व मुघलांच्या विकृतीचे अंधानुकरण करत आज काही नतद्रष्ट लोक आपली संस्कृती व संस्कार विसरून आपल्याच मातृशक्तीवर वाईट नजरेने बघत अत्याचार करत आहेत. २१व्या शतकात लोकशाही व संविधानाच्या राज्यात आज पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी अनेक दशके वाट बघत झुरावे लागत आहे. गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. गुन्हेगारांची सजा माफ व्हावी यासाठी ही अनेक विकृत लोक पुढाकार घेत आहेत!

सामान्य जनता मेणबत्त्या पेटवून शांत बसत आहे. पण आता मऊ मेणबत्त्या नाही तर जनतेच्या हृदयात रंगाडया मशाली पेटल्या आहेत हे दाखवून देण्यासाठी आमची वसई सामाजिक संस्थेने ‘आता मेणबत्त्या नाही मशाली पेटणार’ या ब्रीदवाक्याखाली शिव-शक्ती दौडचे आयोजन केले. वसई पूर्व ते वसई किल्ला या दौडीत अनेक युवक युवतींनी सहभाग नोंदवला. आमची वसई सह धर्मसभा, विद्वत्संघ, विदर्भ युवा संघटना, बजरंग गृप, रुग्णामित्र संस्था, पुस्तक यात्रा, वसईचा राजा मित्रा मंडळ, शिवा संघटना इत्यादी संस्थांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

‘आमची वसई’ तर्फे 8 मार्च ला महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी स्वसंरक्षण व सायबर सिक्युरिटी चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे . तसेच मातृशक्तीने आपल्या मुलांवर जसे जिजाबाईंने शिवबावर संस्कार घातले तसेच संस्कार घालण्याचा पूर्ण प्रयत्न करावा असे आवाहन करत वसई किल्ल्यातील आदिशक्ती आई वज्रेश्वरी मंदिरात महिलांच्या हाती दैदिप्यमान मशाली देण्यात आल्या असे धर्मसभा सचिव पंडित हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!