“आमची वसई” गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा !

वसई : “आमची वसई” सामाजिक संस्थेने १४ विद्या ६४ कलांचा अधिपती श्री गणनायकाच्या  वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून तालुक्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पारंपारिक रित्या व बाळ गंगाधर टिळकांच्या उद्देशांना अनुसरून गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आणि चलचित्र व चित्रकला स्पर्धा २०१९ चे आयोजन केले होते. त्या अंतर्गत शूर्पारक (नायगाव, वसई, नालासोपारा,विरार, वैतरणा) प्रांतातून गणेशभक्तांनी स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. वसईचा राजाच्या साक्षीने बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव : प्रथम पारितोषिक विजय पॅरडाईस सोसायटी,वसई. द्वितीय- धर्मजागृती बालगणेशोत्सव मंडळ, नायगाव. तृतीय- सेवन स्क्वेअर ॲकॅडमी,नायगाव.
उत्तम घरगुती देखावा : प्रथम पारितोषिक सचीन सकपाळ, द्वितीय- नेहा चाफेकर, तृतीय- आकाश वैती.
घरगुती चलचित्र : प्रथम- सुशांत वर्तक,नायगाव. नचिकेत वर्तक, नायगाव.
चित्रकला स्पर्धा (वयोगट ५-१०): प्रथम-विश्वा रावल, द्वितीय-अश्विनी राउत, तृतीय- स्वरा शेट्ये. (वयोगट ११-१५ ): प्रथम- मल्हार वाघ, द्वितीय- स्लॅव्हिऑन डिकर, तृतीय- सहनान कोरिया. (खुला वयोगट ): प्रथम- प्रवीण घरत, द्वितीय-विमल तेलंगे, तृतीय शेफाली मोंडकर.
घरगुती शाडू मूर्ती स्पर्धा: प्रथम-हर्षाली वर्तक, द्वितीय-सुनिल मोसेकर, तृतीय – स्वप्नील सामंत.
सर्वातलहान गणेशमूर्ती स्पर्धा: प्रथम- अभिजीत पंडित, द्वितीय-माधवी बोरवणकर, तृतीय- मयुर धुमासीया.
छायाचित्र स्पर्धा: प्रथम-आशिष गुरव, द्वितीय-निलेश चौधरी, तृतीय- अथांग चौधरी. 
शूर्पारक धर्मप्रांताचे धर्माधिकारी पंडित हृषीकेश वैद्य, आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे, वसईचा राजा मंडळाचे विजय घरत, राहुल भांडारकर, योगेश व निलेश भानुशे, तसेच आमची वसई चे हेमंत मातवणकर, ज्योती मलिक, कुलदीप मलिक, हेमराज घरत, नितीन वानखेडे, प्रजीत पाटील, विजय जांभेकर, विक्रांत चौधरी, रोशनी वाघ, शैलजा जांभेकर, संजय आच्छीपाल्या आदि सदस्यांच्या हस्ते बक्षीस व पारितोषिक वितरीत करण्यात आले. स्पर्धकांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळून कौतुक झाल्याबद्दल आमची वसई चे आभार मानले व पुढील वर्षी आणखी मेहनत घेउन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. कार्यक्रमाचे छायाचित्रण देव मुव्हीज तर्फे विनामूल्य करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: