आमची वसई ची “ज्ञानदान मोहीम” !!!

वसई : पालघर जिल्ह्यात बहुसंख्य गरीब- वनवासी व दर्यावर्दी विद्यार्थीवर्ग पुस्तकांसोबत इतर शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहे. या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमची वसई प्रतिवर्षी प्रमाणे ज्ञानदान मोहीम हाती घेतली. जिल्ह्यातील जागृक जनतेने या मोहिमेस उदंड प्रतिसाद देत आमची वसईच्या Collection Centers मधे भरपूर शैक्षणीक साहित्य जमा केले. जमा झालेले सहित्य रविवार दिनांक १६ जून, २०१९  रोजी पालघर जिल्ह्यातील स्वातंत्र्योत्तर काळातही उपेक्षित असलेल्या वनवासी व दर्यावर्दी भागतील २५० गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. याप्रसंगी आमची वसई सभासदांनी व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला.

शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी अनंददायी व प्रसन्न वतावरणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. अजुन साहित्याचे १० मोठे बॉक्स शिल्लक आहेत, ते येत्या काही दिवसात जिल्ह्यातील ५ जिल्हा परिषद शाळांमध्ये वाटण्यात येतील. गरजू विद्यार्थ्यांसाठी आमची वसई सदस्य हिम्मत घुमरे यांनी ६ संगणक व १०० दप्तरे दान करून सिंहाचा वाटा उचलला. सायबा गृप तर्फे वह्या, ब्राह्मण उत्कर्ष मंडळातर्फे फलक व वह्या, धर्मसभा सदस्य अपर्णा आफळे यांनी पादत्राणे व धर्मसभे तर्फे विविध शैक्षणिक साहित्य सर्वधर्मीय व अनुसुचीत जाती-जमातीच्या, आर्थिकदृष्ट्या मागास व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले.
“परकीय आक्रमणांच्या आधी भारतात सर्वजातीय नागरिक उच्चविद्या विभुषित होते. तक्षशीला – नालंदा सारखी विश्वविद्यालये भारतात होती. शिक्षा, रक्षा, अर्थ, सेवा व न्याय क्षेत्रात भारताची बरोबरी करणे कोणालाही शक्य नव्हते. परंतू फेतांध व जुलमी परकीय सत्तांनी गेली १२०० वर्ष कुनिती, कुटीलता व अत्याचार करून ज्ञान विज्ञाना सहित सर्वकला-गुण संपन्न असलेल्या भारताला उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्यात सर्वजातीय भारतीय भरडले गेले. अनेक धर्मगुरू,  विद्वान, शूरवीर, क्रांतीकारी व देशभक्तांनी आपले आयुष्य पणाला लावून परत भारताला स्वतंत्र केले. स्वातंत्र्योत्तर काळातही आरक्षणादिच्या विचित्र भेदभावामुळे शिक्षण व्यवस्था व त्यामुळे पुढील सर्व व्यवस्था ढासळत चालली आहे. आता भारताला ज्ञान-विज्ञाना सहित सर्व क्षेत्रात पूर्वीप्रमाणे शिखरावर नेउन ठेवणे ही आपली जबाबदारी आहे” असा उपदेश धर्मसभा सचिव पं. हृषीकेश वैद्य यांनी दिला. आमची वसईने मोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकर्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले व वंदे मातरम् या राष्ट्रगानाने मोहिमेची सांगता झाली  !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: