आमची वसई तर्फे अत्यावश्यक सेवा पुरावणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनामूल्य वाहतूक सेवा ! 

वसई : ट्रेन,  रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर बंद आहेत अश्या परिस्थितीत २४ तास अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या पोलीस, वैद्यकीय सेवा, महावितरण (MSEB), पेट्रोलपंप, ATM Security, पत्रकार, पाणीपुरवठा इ. कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकीची जण ठेवत धर्मसभेच्या मार्गदर्शनानुसार आमची वसई सामाजिक संस्थेतर्फे ज्या कर्मचाऱ्यांकडे स्वतःचे वाहन नाही अश्यांना कामावर व कामावरुन घरी जाण्यासाठी दुचाकी वाहनाद्वारे विनामूल्य मदत केली जात आहे. यासाठी आमची वसई च्या २५ सुसज्ज दुचाकीस्वारांची टीम कार्यरत आहे. 

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनी आयकार्ड / ऑर्डर/ ड्युटी पेपर दाखवल्या शिवाय व मास्क शिवाय सेवा दिली जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!