“आमची वसई” तर्फे खास महिलांकरिता रात्रीची महिला चालक रिक्षा सुविधा !

वसई : अलीकडेच हैद्राबाद व एकूणच देशभरात घडत असलेल्या घटना व महिला-मुलींवरील वाढत असलेल्या  अत्याचारांना रोखण्यासाठी आमची वसई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, पोलीस रेझींग डे सप्ताहाच्या अनुषंगाने पं. हृषीकेश वैद्य गुरुजी यांचा मार्गदर्शनाखाली “देशाची संपत्ती आता आमची जबाबदारी” या उपक्रमांतर्गत कु.पूजा मालती कट्टी यांनी पुढाकार घेऊन महिला रिक्षा चालक मिनाज नदाफ यांच्या सहकार्याने महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून खास रात्रीच्या वेळेस (रात्री 11 ते स 5)  वसईकरांसाठी महिला रिक्षा चालक असलेली खास रिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले.

या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वसई-विरार मधील महिला रिक्षाचालक उपस्थित होत्या. महिला रिक्षा चालक मिनाज नदाफ या मैरेथोन पटू असल्याने कुटुंबाच्या उपजीविकेच साधन म्हणून रिक्षा चालवत असून वसई विरार मध्ये महिला रिक्षा चालकांना प्रथम दिशा देणाऱ्या किरण बढे, लीना गौडा व नॅन्सी ताई यांचे आभार मिनाज नदाफ यांनी यावेळी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या पूजा कट्टी यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम वास्तवात आणला याबद्दल पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग (IPS), वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, तसेच महिला पोलीसांनी शुभेच्छा दिल्या. आमची वसईच्या महिला सदस्या रोशनी वाघ, मरिअम्मा अग्रवाल,मधूबाला सिंग, पल्लवी पवार, वैष्णवी भट, पूजा निषाद व सुरेखा अभ्यंकर यांनी रिक्षाचे पूजन करुन वालिव पोलीस चे पीआय श्री पराड यांच्या हस्ते नारळ वाढवून उपक्रमाचा श्रीगणेशा केला. पोलीस दलाने आमची वसई चे आभार मानले व अशा संस्थांची गरज या समाजाला आहे असे कौतूक केले. अधिकाअधिक महिला रिक्षा चालकांनी अशा उपक्रमाकरीता पुढे यावे असे आवाहन आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी केले.
मिनाज नदाफ यांना 9604522197 या क्रमांकावर संपर्क साधून महिला या रात्र रिक्षा सेवेचा लाभ घेऊ शकता. प्राथमिक स्वरूपात नालासोपारा पुर्व (तूळींज-मोरेगाव-अचोळे) विभागात ही सेवा उपलब्ध होणार आहे अशी माहीत पूजा कट्टी यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: