आमची वसई तर्फे दहशतवादा विरोधात पदयात्रा व “मानवी साखळी” चे आयोजन !

वसई : आमची वसई व अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येउन बाळा सावंत हुतात्मा स्मारक , पापडी-वसई  येथे दहशतवादा विरोधात आवाज बुलंद केला. भारत सरकारला खरच सैनिकांची काळजी असेल तर सर्वप्रथम संविधानाचे ३५A सकट कलम ३७० निरस्त करावे असे मत यावेळी मांडण्यात आले. तालुक्यातील आबालवृद्ध नागरिकांनी या आतंकवाद विरोधी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेत कठोर शब्दात आपला निषेध व्यक्त केला. अनेकांनी सैन्याला व त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याचे ठरवले. सैनिकांचा मान राखणे, अफवा न पसरवणे, संदिग्ध व्यक्ती/ वस्तूची माहिती पोलिसांना देणे, सिव्हिल डिफेन्स चे शिक्षण घेउन स्वतः आपत्प्रसंगी लोकांना मदत करणे इत्यादि विषयांवर चर्चा करण्यात आली.

हुतात्मा स्मारक ते दत्तानी मॉल पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. बिगबाझार समोर मोठे रिंगण घालून मानवी साखळी साकारण्यात आली. मोहिमेची सांगता वंदेमातरम् ने करण्यात आली. धर्मदभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी प्रबोधन केले व जवानांसाठी प्रार्थना केली.
आमची वसई , धर्मसभा, विद्वत्संघ, आपली वसई, नरवीर चिमाजी आप्पा प्रतिष्ठान, ध्यास, ब्राह्मण उत्कर्ष मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ , रुग्णमित्र संस्था, वसई चा राजा, धर्म जागृती मंडळ, सिंधी समाज, पंजाबी समाज, वसई हॉटेल असोसिएशन, वसई पत्रकार संघ, वसई फोटोग्राफर असोसिएशन तसेच अनेक संस्थांनी व सर्व पक्षीय सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!