“आमची वसई” ने वसई किल्ल्यात केले जिल्ह्यातील सर्वात मोठ्या झेंड्याचे वंदन !

वसई : वसईकरांच्या विनंतीवरून – छत्रपती शाहूमहाराजांच्या आदेशावरून धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून समस्त वसईकर रयतेल मुक्त करणाऱ्या मराठा सैन्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसई किल्ल्यावर “आमची वसई” सामाजिक संगठनेने ध्वजवंदन केले. प्रतिवर्षी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे वसई किल्ल्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते. सालाबादाप्रमाणे आमची वसई सामाजिक संगठनाही ध्वजवंदनास उपस्थित असते. पालघर जिल्ह्यातील हा सर्वात मोठा राष्ट्रध्वज असतो. 

छत्रपती शाहूमहाराजांच्या आदेशानुसार व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईकर रयतेला धर्मांध पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केले व वसई किल्ल्यावर जरीपटका फडकवला. एका युरोपीय सत्ते विरुद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता. आप्पांनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असललेली व्यवस्था येथे लावून दिली. सर्व जातीच्या लोकांना पूर्वीप्रमाणे गुण्यागोविंदाने वसवले. इतकेच नव्हे तर सर्वधर्मियांना अभय दिले. रयतेला हवे असलेले स्वराज्य व सुराज्य स्थापन केले. या विजयानंतर सर्वधर्मीय वसईकरांनी नरवीर चिमाजी आप्पांना नजराणे सादर केले.
अश्या या पराक्रमाने पावन झालेल्या व छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा जरीपटका ज्या वास्तूत फडकला त्याच ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून त्यास वंदन करण्यात आले. अधिकाधीक वसईकरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आमची वसई सदस्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: