“आमची वसई” मतदान जनजागृती संदेश – स्पर्धा २०१९

वसई : देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, संविधानाने नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावे यासाठी पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था ‘आमची वसई’ ने मतदान जनजागृती संदेश स्पर्धा आयोजित केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा व आपल्या देशाला सुदृढ राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाने सर्वतोपरी प्रयत्न करावे यासाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेचे नियम:
१) प्रत्येकी एक मतदान जनजागृती संदेश देणारा कार्डबोर्ड ग्राह्य धरला जाईल.
२) स्वत:च्या हाताने कार्डबोर्ड वर संदेश लिहून/चित्र काढून आणावे(एकोफ्रेंडली)
३) पंचाचा निर्णय अंतिम.
४) बॅनर, प्लास्टीक वगैरेचा वापर नसावा.
विजेत्यांना आकर्षक “पाकीटबंद बक्षीस” देण्यात येईल.
बनविलेले मतदान जनजागृती संदेश फलक दि. २८/४/२०१९ रोजी रविवारी स. १० ते १२ पर्यंत साथिया ट्रस्ट ब्लड बँक, स्नेहांजली सेंटर मागे, नालासोपारा (प.) येथे स्वत: आणावेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7709907703

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!