आमची वसई रुग्णमित्रांनी घेतली धर्मादाय आयुक्त डॉ शिवकुमार डिगे यांची भेट

मुंबई : शुक्रवार,दिनांक ३०|११|२०१८ रोजी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची रूग्णमित्र विनोद साडविलकर,जितेंद्र तांडेल,संदीप तवसाळकर,डाॅ.संजयकुमार ठाकूर, प्रकाश वाघ,राजेंद्र ढगे यांनी सदिच्छा भेट घेतली. मुंबई महानगरपालिका व धर्मादाय रूग्णालय यांच्या मदतीने मुंबईतील ७४ धर्मादाय रूग्णालयात गरीब गरजू रुग्णांसाठी १६०० पेक्षा अधिक बेड आरक्षित आहेत.गरजवंताना ही सुविधा मिळण्यासाठी ओएसडीच्या माध्यमातून सेवा देण्याची बोलणी सुरू आहे असे धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.त्याचबरोबर रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात लाभ मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाबरोबर मिळून काम करणार असल्याचे आई.ए.कुंदन,अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका(आरोग्य) यांनी बुधवार,दिनांक २८|११|२०१८ रोजीच्या नवभारत टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झालेली आहे.
गरीब गरजू रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात महापालिकेच्या मदतीने सेवा मिळण्याच्या कल्याणकारी उपक्रमाचे स्वागत म्हणून रूग्ण मित्रांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.भविष्यात धर्मादाय रूग्णालय व महापालिका रूग्णालयात रूग्णमित्र दुवा म्हणून काम करणार असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.तशी कल्पना कुंदनमॅडम,अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना शिफारस करणार असल्याचे डिगे,धर्मादाय आयुक्त यांनी आश्वासीत केले. त्याचबरोबर   पालघर जिल्ह्यातील आमची वसई रूग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी धर्मादाय रूग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधांचे निवेदन देण्यात आले.
ह्या निवेदनात निर्धन गट व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांची वार्षिक उत्पन्न ची मर्यादा वाढवून द्यावी, धर्मादाय रुग्णालयातील दान स्वरुपात आलेल्या उपकरणांवर मिळणाऱ्या सुविधांचे दरपत्रक नियंत्रण, राखीव खाटांच्या संख्येत वाढ, शैक्षणिक कार्यासाठी मिळणारा उत्पन्नाचा दाखला वैद्यकीय सेवांसाठी ही वापरात यावा, धर्मादाय नियमांतर्गत अत्यावश्यक सेवा चा समावेश, धर्मादाय नियमांतर्गत उपचार घेणारे रुग्णांची तपशीलवार माहिती, धर्मादाय रुग्णालयातील विश्वस्तांच्या समितीत समाजाभिमुख सदस्यांची नेमणूक ईत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. डिगे साहेब यांनी ह्या सुचनांवर लवकरच निर्णय होईल ह्याबाबत आश्वासन दिले तसेच धर्मादाय विभागातर्फे महाराष्ट्र राज्यात २० डायलेसिस मशीन दान करण्यात आल्या अशी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!