आमची वसई, वनविभाग व महाराष्ट्र पोलीस तर्फे १००० वृक्षांचे रोपण !!

परशुराम भूमीच्या रहिवश्यांनी भगवान परशुरामांचा आदर्श ठेवावा! – पं.हृषीकेश वैद्य (अध्यक्ष, आमची वसई)

वसई : आपल्या कोंकणभूमीत सर्वात पहिली वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची मोहीम भगवान परशुरामांनी हाती घेतली होती.भगवान परशुरामांनी उच्चप्रतीचे पिंपळ, वड, औंदुंबर, अच्युत, डाळिंब, देवदार, बकुळी, जांभुळ, अंजीर, मांदार, आवळे, पारिजात, चिंच, चंदन, शमी, चाफा, सप्तपर्णी, बेल, कदंब, कण्हेर, सेवरी, पळस, फणस, कोकम, अशोक, अगस्ती, अर्जुन, कोविदार, कुडे, कंचन, नारळ, सुपारी या ३२ प्रकारच्या वृक्षांचे  मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करून आपल्या क्षेत्रातील क्षारांना कमी केले, पाण्याची पातळी सुरक्षित करून पर्यावरणाचा सुंदर समतोल राखला. भगवान परशुरामांनी द्राक्ष, प्रवाल, कनक, नाग, जाई, जुई यांच्या सुंदर सुंदर वेलींचेही मोठ्याप्रमाणात रोपण केले. आमची वसईने भगवान परशुरामांचे स्मरण करुन वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली. 

आमची वसई या अराजकीय संस्थेने वसई पूर्व येथे केलेल्या वृक्षारोपण कार्याचा गौरव करताना धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य म्हणाले की, “वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य हे वैदिक परंपरेचे समाजवादी कार्य आहे, जे युगानुयुगं सातत्याने चालले आहे. अशा सत्कार्यामुळेच भारत देश सातत्याने जैव विविधतेने नटलेला व संपन्न राहिला. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा लाभ सर्व प्राणी व सर्व जाती-धर्माच्या मानवांना होतो. या सर्वोपकारक कार्याचा श्रेष्ठ पायंडा उत्तर कोंकण भूमीत सर्वप्रथम भगवान श्रीपरशुराम व तत्कालीन ऋषींनी रुजवला. तीच श्रेष्ठ सर्व सेवेची परंपरा आमची वसई संस्था वृक्षारोपण व संवर्धन कार्याचे रूपात चालवीत आहे हे कौतुकास्पद आहे”
सदर अभियानात धर्मसभा, ग्रीन अंब्रेला, राज्य सरकार महामित्र , रुग्णमित्र संस्था, नरवीर चिमाजी आप्पा प्रतिष्ठान, नरवीर रायडर्स, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गमित्र,  शिवा संगठना, बाबासाहेब आंबेडकर कॉलेज-वसई , आधार फाउंडेशन इत्यादी संस्थांचे शेकडो कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: