आमदार क्षितिज ठाकूर यांनी घेतली केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची भेट

वसई दि,6 : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करिता आमदार क्षितिज ठाकूर यांनी घेतली केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची आज दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमवेत वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर उपस्थीत होते.

मुंबई सह पालघर जिल्हा तसेच दक्षिण गुजरात कडे जोणारा (समुद्र महामार्ग) कोष्टल हायवे राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार असल्याने आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी ह्यांचे आभार मानले. कोष्टल रोड सुरु करताना विविध मुद्दयांसह त्यांच्या मतदारसंघातील आणि पालघर जिल्ह्यातील काही पायाभूत सुविधांच्या समस्या त्यांनी मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्या. यासदंर्भातील निवेदन आमदार क्षितिज ठाकूर तसेच महापौर रुपेश जाधव यांनी दिल्ली येथे दिले.

सदरच्या निवेदनामध्ये पालघर जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला जोडण्याची तात्काळ गरज असून आर्थिक आणि पर्यटन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महानगरीय क्षेत्र आणि गुजरात राज्याशी जोडण्यासाठी सुधारणा करण्याची गरज असून ते कॉरिडॉरच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करेल आणि रहदारी कमी करण्यात मदत देखील करणार असल्याचे समजावून दिले.

किनाऱ्यावरील कॉरिडोर आणि रिंग रोड रस्ता अशा दोन रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे यामध्ये सध्याचा एनएच -8 अस्तित्वात आहे. तर प्रस्तावित खाडी ब्रिजपासून नायगाव पूल पर्यंत मुंबई सागरी रोड म्हणून प्रस्तावित आहे.

सागरी महामार्ग पश्चिम किनारपट्टीच्या शहराशी जोडत असला तरी,टेंबीखोडा (पालघर तालुक्यातून) ते म्हारंबळपाडा (वसई तालुका) पर्यंत हा सागरी महामार्ग जोडला तर थेट मुंबई आणि वसई-विरार शहरांना हा महामार्ग जोडला जाईल. त्यामुळे पालघर तालुक्यात वसई-विरार शहराला जोडणारे प्रमुख ब्रीजचा समावेश करुन लवकरात लवकर त्यांस मंजुरी मिळावी या करिता विनंती करण्यांत आली. सदर महामार्ग शहराला जोडल्यास जलद प्रवास, प्रति ट्रिप 40 किमी पर्यंतचा प्रवास कमी होऊन, जल वाहतूक सह एकत्रित दृष्टिकोन यामुळे येथील क्षेत्रात पर्यटन विकासास मदत होणार आहे.

याच बरोबर 37 किमी चा शहराला चारही बाजूने जोडणारा महापालिकेने प्रस्तावित केलेला रिंग रोड एम.एम.आर.डि.ए मार्फत लवकरात लवकर सुरु करावा यासाठी राज्यशासनाकडून प्राधान्याने कार्यवाही होणेंस निवेदन दिले. वसई-विरार शहरवासियांना फायदा होण्यासाठी निवेदनात दिलेल्या सूचना प्रस्तावित सागरी महामार्गाच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करणेकामी विनंती करण्यांत आली.

फेरीबोट सेवा

सागरमाला योजने अंतर्गत ठाणे-भाईदर-वसई फेरिबोट सेवा सुरु होणार असून विविध ठिकाणी जेटींची कामे देखील सुरु आहेत.त्यासाठी उल्हास-वसई नदीतून नायगाव पूर्व ते वसई पूर्व फेरीबोट सुरु झाल्यास दैंनदीन 50 हजार प्रवासी नागरिकांना या सेवेचा फायदा होईल. या योजने अंतर्गत मालजीपाडा,ससुनवघर, जुचंद्र, राजावली, टिवरी ते नवघर पूर्व या भागातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांन बरोबर फेरीबोट सेवेमुळे येथे पर्यटन व्यवसायास व रोजगार निर्मीतीस देखील चालना मिळेल. याकरिता ह्या प्रकल्पाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी. ही मागणी यावेळी केली.

वसई विरार शहरातील मुख्य वसई खाडीची सध्या सरासरी 21 मीटर उंची आहे आणि विकास आराखडयानुसार प्रस्तावित रूंदी 40 मी इतकी आहे. यासाठी सदस्यस्थीतील खाडी रुंदिकरण व खोली वाढविणेचे काम महानगरपालिके मार्फत चालू आहे. खाडीच्या विस्तारानेच केवळ जलवाहतूकीलाच लाभ न होता. वसई विरार शहराला पूरापासून धोका कमी करण्यास मदत होईल. यागोष्टींचा विचार करता या प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी विनंती देखील आमदार क्षितिज ठाकूर व महापौर रुपेश जाधव,माजी महापौर नारायण मानकर यांनी यावेळी सदर निवेदनाचा केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी सकरात्मक निर्णय घेवून लवकरात लवकर या सुचना अमंलात आणण्यासाठी माझे सर्वोतपरी सहकार्य आहे, असे आश्वासीत केले.

One comment to “आमदार क्षितिज ठाकूर यांनी घेतली केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची भेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!