आमदार प्रशांत परिचारक यांना सेनेने विरोध केल्याने उपसभापतीची निवडणूक झाली रद्द 

मुंबई । जयंत करंजवकर

विधानपरिषदेचे उपसभापती पद शिवसेनेला देण्याचे भाजपाकडून निश्चित कऱण्यात आले होते. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदारीला शिवसेनेने विरोध करायचा नाही, अशी अट भाजपाकडून घालण्यात आल्याने शिवसेनेने उपसभापती निवडणुकीतून माघार घेतल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विधान परिषदेच्या उपाध्यक्षपद  शिवसेनेला देण्याचे ठरले होते. मात्र भारतीय जवानांचे चारित्र्यहनन करणारे भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आमदारकीला शिवसेनेने पाठींबा द्यावा अशी अट घातल्याने सेनेने त्याला विरोध केला आणि विधान परिषदेची उपसभापती पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
सीमेवर भारतीय जवान असतात आणि त्यांच्या बायका गरोदर असतात आणि मूल झाल्यावर पेढे वाटले जातात, असे विधान भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी एका निवडणूक प्रचारात केले होते. त्याचे पडसाद राज्यात आणि देशात उमटले. त्यानंतर राज्य सरकारने त्यासंदर्भात समिती नेमली होती.  आमदार परिचारक यांच्या सीमेवरील जवानांचा अपमान करण्यावर प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे एक वेळ उपसभापती पद नसले तरी चालेल परंतु शिवसेना आमदार प्रशांत परिचारक यांना पाठींबा देणार नाही, अशी भूमिका सेनेने घेतल्याने ही निवडणूक रद्द झाल्याचे समजते.
विधान परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ आणि शिवसेना- भाजपाचे संख्याबळ ३४ आहे. अपक्ष ६ आमदारांसह १० अन्य सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!