आम्ही करून दाखवले – आम.क्षितिज ठाकुर

वसई : गेल्या २५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत वसई-विरारकर नागरिकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले.त्याची उतराई करण्याचा मी,माझे कुटुंबिय व सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले,व त्यामध्ये आम्ही यशस्वीही ठरलो.गेल्या काही वर्षात वसई-उपप्रदेशात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व हां हां म्हणता लोकसंख्या १५ लाखाच्या घरात पोहोचली.नागरी सुविधाचे प्रश्न आ वासून उभे ठाकले.परंतु या आव्हानाला आम्ही धैर्याने सामोरे गेलो.त्यामध्ये महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नाचा समावेश होता.सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचा अतिरिक्त टप्पा, ६९ गावाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आम्ही कंबर कसली व आज अभिमानाने सांगू शकतो, आम्ही करुन दाखवले.
या व्यतिरिक्त देहरजे,कामण-सातीवली व खोलसापाडा इ.ग्रामीण भागातील योजना प्रस्तावित असून लवकरच शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.लोकांसाठी पाणी उपलब्ध करणे,यास आम्ही सर्वोच्च् प्राधान्य दिले.ज्या विरोधकांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा होती,त्यांनी मात्र आमच्या प्रयत्नाना सतत खो घालण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे योजना लवकरात लवकर मार्गी लागण्याऐवजी विलंब होत गेला.ही आमच्या सहनशीलतेची एकप्रकारे परीक्षाच होती.लोकांचे आशीर्वाद व आमच्यावर असलेले प्रेम,अशा शिदोरीवर आम्ही बाजी मारली.त्यामुळे विरोधकांचे सद्या अवसान गळाले असून,त्यांची पुन्हा कोल्हेकुई सुरू झाली आहे.परंतु वसई,विरार,नालासोपारा व नवघर-माणिकपूरवासीय त्याला धूप घालणार नाहीत.केवळ विरोधाला विरोध,असे राजकारण आम्ही केले नाही व भविष्यात करणारही नाही.राजकारणासोबत समाजकारण,असे संस्कार आमच्या वाडडीलांनी आमच्यावर केले आहेत,त्यास कधीही तडा जाऊ देणार नाही.कितीही वादळे व संकटे आमच्यावर येऊ द्या,परंतु सामाजिक बांधिलकीची कास आम्ही सोडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!