आम.क्षितीज ठाकूर यांच्या सभेला एव्हरशाईनमधे गर्दी

नालासोपारा (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता नालासोपाऱ्यातही रंग चढू लागला आहे. आज महाआघाडीच्या पालघर मतदार संघातील बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ आम.क्षीतीज ठाकूर व महापौर रुपेश जाधव यांच्या एव्हरशाईन सिटीतील सभेला जंगी प्रतिसाद मिळाला.

नगरसेविका रेश्मा जाधव व महापौर रुपेश जाधव यांच्या प्रभागांत ही जंगी सभा झाली.  माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात महापालिकेने आजवर अनेक मोठे प्रकल्प राबवले आणि जनतेच्या मागण्या व गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च केला आहे. केवळ पाच-सात वर्षात शहरांचा विकास झाला तो केवळ आपले एक खासदार बळीरामजी जाधव हे तिथे होते म्हणून झाला आहे.परत तोच विकासवेग आपल्याला हवाय तर परत बळीराम जाधव यांनाच आपण निवडून दिले पाहिजे, असे विचार व्यक्त केले.

महापौर रुपेश जाधव यांनी सध्याच्या परिस्थितीत पालघर तालुक्याला मनं दुषित करणाऱ्या सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब करणाऱ्या राजकारणाची अजिबात गरज नाही. या ठिकाणी गरज आहे ती लोकांच्या भल्यासाठी सर्व जात पात धर्म , प्रांत भेद बाजूला ठेवून एकत्र येऊन परिस्थितीशी लढण्याची. तरच आपल्या प्रमाणे शेजारच्या तालुक्यांचा विकास झपाटयाने होऊ शकेल. राजकारणात आपण मागे पडू शकतो मात्र समाजकारणात पुढेच राहू शकतो. आपले लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांचे धोरण आज सर्व सहकारी पक्षांना व संघटनांना पटते आहे. म्हणूनच आज या निवडणुकीत माठे मोठे पक्ष आपल्याला साथ देत आहेत. आपला विजय जस जसा निश्चित होत चालला आहे तस तसा महायुतीकडून रडीचा डाव टाकला जातो आहे. शिट्टी चोरीचा मामला हे त्याचे एक उदाहरण आहे..(हशा ..) आपल्या सुख दु:खात बहुजन विकास आघाडी हा पक्ष आपल्याबरोबर असतो,असे विचार या सभेत व्यक्त केले.

या सभेत नगरसेविका रेश्मा जाधव, माजी नगरसेविका प्रतिभा पाटील, युवा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. आजवर प्रभागवार झालेल्या सभांमध्ये आजची एव्हरशाईन सिटी, लास्ट स्टॉप ची सभा सर्वात मोठी होती. आम.क्षितीज ठाकूर व महापौर रुपेश जाधव या युवा नेत्यांचा हाच झंझावात पुढे नगरसेवक वैभव पाटील, चंद्रकांत गोरिवले, निलिमा गायकवाड यांच्या प्रभागात चालू राहिला. त्या कधी कपोल हायस्कूल जवळ झालेल्या अशाच कोपरा सभेत आम. क्षितीज ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला. महिलांची उपस्थितती या सभेत उल्लेखनीय होती.

 नगरसेवक भूपेंद्र पाटील यांनी या सभेचे आयोजन केले होते. इथेही महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर उमेश नाईक, माजी नगरसेवक आत्माराम पाटील, मुनीर खान, ब.वि.आ.चे शहर उपाध्यक्ष रमाकांत वाघचौडे, प्रभारी आर्चिस पाटणकर, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष राजेश पांडे, पक्ष पदाधिकारी नवनाथ शिंदे, बळीराम पाटील इ.मान्यवर या सभेत सहभागी झाले होते.

जिथे मानवी वस्ती तिथे पाणी पोहचवा,  जीवनावश्यक बाब आहे म्हणून घर वा चाळ लीगल वा इललीगल हे बघत बसू नका. ते दुसरा विभाग बघेल. असे स्पष्ट निर्देश अप्पांनी महापालिकेला दिले आहेत. सर्वांना पाणी जोडणी मिळेल. निवडणूक आचारसंहिता लागू आहे म्हणून काही कामं थांबली आहेत. इतर महापालिका जुन्या असून आपण केवळ9 वर्षात राज्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. स्वच्छ भारत अभियान,कला व क्रीडा क्षेत्राची चळवळ, आरोग्य सेवा यात आपण केवळ आपलेच नाही तर पालघर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

  आम. क्षितीज ठाकूर थेट नागरिकांच्या गराडयात

कपोल हायस्कूल व एव्हरशाईन सभांमध्ये नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर हे सहभागी झाले होते. त्यांनी भाषण न करता जमलेल्या बहुभाषिक नागरिकांशी थेट सवाल जवाब शैलीत संवाद साधला. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नजीकच्या काळात वसई सह संपूर्ण पालघर जिल्हा पर्यटन विकासासाठी, त्या योगे रोजगार निर्मिती साठी, आर्थिकदृष्टया सबळ होण्यासाठी नियोजन पूर्वक काम आपण करणार आहोत ते कसे हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट  केले.

  मोठया प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल आणि त्या योजना चालू आहेत. मात्र वीजपुरवठा, रेल्वेचे प्रश्न, वन विभागाचे, मीठागराचे भवितव्य, जल मार्ग , वाढीव उड्डाणपूल, नळाद्वारे गैस पुरवठा, मेट्रो सुविधा अशा मोठया कामांसाठी आपले महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे , संसदेत जाणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण सारे मिळून त्यांना या 29 च्या निवडणुकीत निवडणून देऊ. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती आधी पार पाडू. आता आपली निशाणी रिक्षा आहे जी तुमच्या जोरावर दिल्लीला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!