आयुक्त पवारांनी दाखवली आपली निवृत्तीची पॉवर

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांनी निवृत्त होऊन जाताना आपली शेवटची पॉवर दाखवत अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

पालिकेचे आयुक्त बळीराम पवार ३१ डिसेंबरला निवृत्त झाले असून,आता महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.मात्र,पवारांनी जाता-जाता  अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करून आपली शेवटची पॉवर दाखवत अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.त्यात अनेक सहाय्यक आयुक्तांना पायउतर करण्यात आले आहे.तर काहींना बढती देण्यात आली आहे. त्यात मेधा वर्तक, प्रेमसिंह जाधव, राजेश घरत, मिलींद पाटील, वसंत मुकणे, अंबादास सरवदे, दीपली ठाकुर, विकास पाडवी, प्रशांत चौधरी आणि सुरेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

वरिष्ठ लिपीक मेधा वर्तक या प्रभाग समिती आयच्या प्रभारी लेखापाल होत्या आता त्यांना या समितीच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. उपअधिक्षक असलेले प्रेमसिंह जाधव अभिलेख कक्षाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त होते. त्यांना निवडणूक आणि जनगणना,स्थायी समितीचे सभापती यांचे स्वीय सहाय्यक आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरे उपअधिक्षक राजेश घरत यांना धानिव-पेल्हार समितीचे सहाय्यक आयुक्त पद देण्यात आले आहे.आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरिक्षक वसंत मुकणे यांना प्रभाग समिती ‘सी’ चे सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. तर वरिष्ठ लिपीक असलेले अंबादास सरवदे हे प्रभाग ‘सी’ चे सहाय्यक आयुक्त होते. त्यांची नालासोपारा प्रभाग ‘ई’ मध्ये उपअधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रभाग ‘एफ’ च्या सहाय्यक आयुक्ता दीपाली ठाकुर यांची ‘एच’ प्रभागात महिला आणि बालकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे.

लिपीक विकास पाडवी यांच्याकडे आय समिती सहाय्यक पदाची जबाबदारी होती.ती काढून त्यांना प्रभाग ब च्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.लिपीक प्रशांत चौधरी वालीवचे सहाय्यक आयुक्त होते.त्यांना आता मुख्यालयातील लेखा विभागात पाठवण्यात आले आहे.तर निवडणूक व जनगणना विभागात असलेल्या सुरेंद्र पाटील यांना जी समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.आयुक्त पवार यांनी जाता-जाता आपली पॉवर दाखवल्यामुळे या पदाधिकाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!