आरोग्य ज्ञानेश्वरी वार्षिक अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

उजवीकडून, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,आमदार डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर अर्चना जोशी, त्या दोघां मागे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरिष महाजन, डॉक्टर हेमंत जोशी, व डॉक्टर हेमंत  व अर्चना जोशी यांचे  मागे डॉक्टर मोहन दूधाट , डावीकडे शेवटी राज्य सभा सदस्य डॉक्टर विकास महात्मे आहेत.

विरार : आरोग्य ज्ञानेश्वरी वार्षिक अंकाचे लठ्ठपणापासून सुटका या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुंबईतील विधान भवनातील त्यांच्या दालनात केले.
बालकांच्या आरोग्याची काळजी  डॉक्टर हेमंत जोशी व डॉक्टर अर्चना जोशी गेली ३३ वर्षे पालघर जिल्ह्यातील विरार येथील त्यांच्या जोशी बाल रुग्णालयातून घेत आहेत, तसेच आरोग्य ज्ञानेश्वरी या वार्षिक अंकाद्वारे आरोग्य साक्षरता करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांचे कौतुक केले.
 कार्यक्रमाच्या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरिष महाजन, राज्य सभा सदस्य डॉक्टर विकास महात्मे,आमदार डॉक्टर अनिल बोंडे, डॉक्टर मोहन दूधाट , इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व सर्व मतदार संघात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोक शिक्षण व्हावे याकरिता डॉक्टर जोशी यांनी सर्व आमदारांना आरोगत ज्ञानेश्वरी चा अंक भेट  दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!