आरोग्य विभागाचा उलटा कारभार ; कारवाई करण्याऐवजी खोटे प्रमाणपत्र देऊन डॉक्टरची पाठराखण

वसई(प्रतिनिधी) : संदर्भातील माहिती प्रमाणे डॉ.योगेंद्र रवी यांच्या मालकीच्या निवासी सदनिका क्र.१ ते ४ निलगिरी, गिरीविहार सोसायटी, वीर सावरकर नगर, वसई येथे असून सदर सदनिका त्यांनी निवासी भाडेतत्त्वावर डा.धर्मेंर्द्र दुबे यांना ऑॅगस्ट २०१८ मध्ये वापरण्यासाठी दिल्या.

सदर जागेमध्ये डॉ.धर्मेंर्द्र दुबे यांनी सोसायटीला कोणतेही पूर्वसूचना न देता अथवा सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्र शिवाय संसर्गजन्य श्वसनरोग व क्षयरोग यांच्यावर उपचार करण्यासाठीचे रुग्णालय सुरू केले. संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रुग्णालयास परवानगी न देण्याचा ठराव संमत करून पदाधिकारी आणि सभासदांनी सदर रुग्णालय हे बंद करण्यासाठी डॉ.योगेंद्र रवी यांना विनंती केली. परंतु सदर रुग्णालय हे कसे फायदेशीर आहे आणि सोसायटीच्या सभासदांवर सदर रुग्णालयात मोफत उपचार करण्याची लालूच दाखवून रुग्णालय चालू राहावे यासाठी आरोग्य विभागाच्या तत्कालीन अधिकारी डॉ.तबस्सुम काझी व त्यांचे सहकारी यांना सर्वसाधारण सभेत पाचारण करुन डा.योगेंद्र रवी व डॉ.धर्मेंद्र दुबे यांनी सभासदांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. क्षयरोग रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही परवानगी व इतर बाबींची पूर्तता केल्याशिवाय चालू असणारे या रुग्णालयासंदर्भात संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी आरोग्य विभाग (वसई-विरार महापालिका) येथे तक्रार दाखल करून निवासी जागेमध्ये व्यवसाईक तत्त्वावर चालू असणारा या रुग्णालयावर आक्षेप घेतला.

तदनंतर या संदर्भात संस्थेचे पदाधिकारी विजय ठाकूर व नितांत राऊत यांनी आरोग्य विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही काहीही कारवाई न झाल्यामुळे नितांत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे (सी.पी.जी. आर.ए.एम.एस) या पोर्टल द्वारे तक्रार केली. (PMOPG/E/2018/0473292 Dated 04-10-2018). सदर तक्रारीनंतर दिनांक ३१/१०/२०१८ रोजी नितांत राऊत यांना तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण (आरोग्य विभाग, वसई-विरार शहर महापालिका) यांच्याकडून ई-मेल द्वारे प्राप्त झालेल्या पत्रानुसार आरोग्य विभाग यांनी दिनांक २३/१०/२०१८ रोजी सदर रुग्णालय बंद करण्याबाबत संबंधितांस असे एक नोटीस काढून आदेश दिल्याचे कळविले होते.

दरम्यानच्या कालावधिमध्ये झालेल्या काही घडामोडीनंतर सदर प्रकरणासंदर्भात विजय ठाकूर व नितांत राऊत यांनी पुनश्च वारंवार पाठपुरावा करूनही सदर रुग्णालय आजतागायत चालू आहे. इतकेच नाही तर क्षयरोग आणि श्वसनासंबंधी इतर संसर्ग्जन्य आजाराचे रुग्ण सदर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहेत. रुग्णालय धन कचरा व इतर कचरा (Medical bio waste disposal) व्यवस्थापनासंबंधी कोणतेही निकश सदर रुग्णालयात पाळले जात नसून संसर्गजन्य गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बँडेजस, इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या व सिरीज, औषधांची रिकामी खोकी यांची विल्हेवाट दैनदिन कचऱ्यासोबत सार्वजनिक कचऱ्यामध्ये केला जात आहे.

वसई-विरार शहरांमध्ये क्षयरोगाचे १८४ रुगण आढळुन आल्याची नोंद असुन व सदर रुग्णालय चालू झाल्यापासुन आजपर्यंत रुग्णालयांमध्ये काही रुग्ण अत्यंत गंभीर व संसर्गजन्य आजारांमुळे दगावले असून तसे पुरावे आरोग्य विभाग यांच्याकडे सादर करूनही आरोग्य विभागाने डॉ.धर्मेंद्र दुबे यांना दिलेल्या २३/१०/२०१८ रोजीच्या आदेशानंतर व त्यानंतर आणखी दोनदा दिलेल्या नोटिसानंतरही सदर रुग्णालय चालू असल्याने आरोग्य विभागाशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अनधिकृतपणे चालू असणारे रुग्णालये बंद करण्याऐवजी वैद्यकीय अधिकारी डॉ.तबस्सुम काझी यांनी कारवाईसंबाधामध्ये समाधानकारक उत्तरे न देता किंवा गिरिविहार सोसायटी कार्यकरिणी सदस्य व सभासद यांच्याशी कोणतीही सल्लामसलत ना करित दि.०५/०८/२०१९ रोजी घाईघाईमध्ये डॉ.योगेंद्र रवी यांच्या नावाने नर्सिंग होम व प्रस्तुती गृह चालविण्यासाठी परवानगी पत्र तयार करून दिले आहे.

सदर रुग्णालय हे कोणत्याही परवानगी शिवाय डॉ.धर्मेंद्र दुबे हे चालवीत असून प्रमाणपत्र डॉ.योगेंद्र रवी यांच्या नावाने देण्यामागे वैद्यकीय अधिकारी डॉ.तबस्सुम काझी यांचा सदर अनधिकृत रुगणालय चालू ठेवण्याच्या अट्टाहास दिसून येत आहे. तसेच नितांत राऊत यांनी माहिती अधिकाराखाली रुग्णालयावर केलेल्या कारवाईबद्दल मागितलेले माहितीची पूर्तता केवळ रुगहणालयास पाठविलेल्या नोटिसांच्या प्रती देऊन केल्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ.तबस्सुम काझी यांच्या एकंदरित उद्देशाबद्दलच  शंका घेण्यास वाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: