आहुतिच्या दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

अंबरनाथ (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्यावतीने यंदाचा राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा प्रथम पुरस्कार अंबरनाथ येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक आहुतिच्या  52 व्य दिवाळी विशेष अंकाला देण्यात आला. आहुतिचा 52 व्वा दिवाळी विशेष अंक इतिहास या विषयावर प्रकाशित करण्यात आला असून इतिहासाचे गाढे अभ्यासक सदाशिव टेटविलकर हे या दिवाळी विशेष अंकाचे अतिथी संपादक आहेत.
दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या शुभहस्ते, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, मुंबई मित्रचे समुह संपादक व कामगार नेते अभिजित राणे, साहित्यिक व ज्येष्ठ कामगार नेते शंकर मोरे, संघाचे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ  बिरवटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार आहुतिचे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी व कार्यकारी संपादक सौ. मनीषा गिरीश त्रिवेदी यांनी हा प्रथम पुरस्कार स्वीकारला. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी स्वगत व प्रास्तविक केले. श्रीकांत चाळके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. माजी आमदार अरविंद नेरकर, कार्यवाहक संतोष धोत्रे, खजिनदार विजय सावंत, उपाध्यक्ष शंकरराव रहाणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार कोणाचंही असो पण या सरकारला हलविण्याचे काम हे पत्रकारांनी केले पाहिजे असं मत जेष्ठ पत्रकार आणि नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केलं आहे या देशातील जनता सुज्ञ व्हावी याकरिता बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्र काढलं लोकमान्य टिळक डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान संपादक मराठीत झाले आहे असे ते पुढे म्हणाले मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या 18 व्या वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून एकनाथ बिरवटकर हे गेली 18 वर्ष वर्धापन दिन साजरा करत आहेत .दरवर्षी एवढ्या लोकांना एकत्र आणणे सोपं काम नाही असं सुकृत खांडेकर म्हणाले. कै . यशवंत पाध्ये यांनी खूप लोकांना प्रेरणा दिली. वृत्तपत्र लेखक संघ असो कि पत्रकार संघटना ते वृत्तपत्र चे कान डोळे आहेत. या संघटनेतून अनेक लेखक संपादक निर्माण झाले. पत्रकार घडविण्याचे कार्य ही संस्था करत आहे. समाजात काय चाललंय आहे हे लोकांसमोर आणणे गरजेचे आहे, सरकार कोणाचंही असो पण या सरकारला हलविण्याचे काम हे पत्रकारांनी करायला हवे. या देशातील जनता सुज्ञ व्हावी याकरिता जांभेकर यांनी वृत्तपत्र काढलं .लोकमान्य टिळक, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान संपादक मराठीत झाले आहेत. पत्रकारिता ,राजकारण, समाजकारण हे  विश्वासार्थेवर चालत असते .आजच्या घडीला सरकार आणि पत्रकार यांच्यात अंतर निर्माण झालं आहे. तेलगी घोटाळ्यात सगळे निर्दोष सुटले मग घोटाळा कोणी केला हा प्रश्न आहे. असं खांडेकर पुढे म्हणाले. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, कै. यशवंत पाध्ये यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच लेखकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा मोलाचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
समाजातील चांगल्या – वाईट गोष्टींवर वृत्तपत्रमाध्यम प्रकाशझोत टाकत असतात. जनसमूहाला आरसा दाखवण्यासाठी ते काम करत आहेत. समाजाची सेवा करणे हे वृत्तपत्र लेखकांचे काम आहे, असे मत साहित्यिक फादर दिब्रिटो यांनी मांडले. यावेळी  ते म्हणाले की, वृत्तपत्रांवर विश्वासाहर्ता राहिलेली नाही. नुकत्याच परदेशात झालेल्या सर्वेक्षण अहवालात केवळ १७ टक्के लोकांनी वृत्तपत्रांवर विश्वास दाखवला आहे. वृत्तपत्रांसाठी ही बाब खेदजनक आहे. मात्र सत्याला मरण नाही. कारण असत्याला भवितव्य नसते. आजच्या काळात एकाधिकारशाही सुरू असून हे विघातक आहे. जातीधर्माच्या नावावर सगळं खपवले जात आहे. मात्र भारतीय हीच एक जात असून धर्म हे उपासना करण्याचे मार्ग आहेत. देशात यावरून अराजक माजवले जात आहे. परंतु, वृत्तपत्र माध्यमे ही समाजाचे आरसा आहेत. जनसमूहाला मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी करायला हवं. समाजाची सेवा करणे, हे लेखकांचे काम असून याच भावनेतून त्यांनी लेखणी चालवायला हवी. लेखकांनी चांगले कार्य करत राहावे. चांगल्या कामांची पोचपावती कोणी देवोत ना देवोत, मनोदेवता ही देतच असते, असे दिब्रिटो यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अडचणी, वेदना, दुःख, समजून घेऊन सरकारला सांगण्याचे कार्य सांगणारा घटक म्हणजे वृत्तपत्र लेखक होय असे मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शक्य तितक्याना मदत करा, समाज कार्यातच खरा आनंद मिळतो असेही हेगडे यांनी संगीयतले. पत्रकार व कामगार नेते अभिजित राणे, कामगार नेते शंकरराव मोरे आदींची समयोचित भाषणे झाली.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्यावतीने ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती’ पुरस्काराने दै. नवशक्तिचे संपादक सुकृत खांडेकर यांना गौरविण्यात आले.  कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार 2019 चे अनुराधा विष्णूपुरीकर यांना तर जीवनगौरव पुरस्कार 2019 फादर फ्रान्सीस दिब्रिटो यांना देण्यात आला. उद्योग श्री2019 पुरस्काराने देवदत्त देशपांडे – नांदेड यांना गौरविण्यात आले.
पत्रकारभूषण पुरस्कार 2019 चे मानकरी : राजेश राजोरे- देशोन्नती बुलढाणा, गणेश पारकर – दै. पुण्यनगरी ठाणे, अनघा निकम, दै. प्रहार- रत्नागिरी, अजित जगताप, दै. नवाकाळ- जावळी. समाजभूषण 2019 चे मानकरी : दर्शना नामदे- पालघर, ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ. हंसराज वैद्य- नांदेड, रोहिदास भोईर- भाईंदर, बाळाराम खोपकर – ठाणे, लक्ष्मण पाटील – सांगली खानापूर, अभिजित चव्हाण – ठाणे, सचिन गोवळकर – खेड रत्नागिरी, प्रा. सतिश साठे- खेड रत्नागिरी, डॉ. मनीष मवानी, मुंबई, पल्लवी शिंदे- मुंबई.  शिक्षणरत्न  2019  चे मानकरी :  प्रा. अरविंद शिंदे, सांगोला – सांगली. प्रा. नीलकंठ शिंदे, साताराप्रा. दशरथ साळुंखे. पत्रभूषण  2019   चे मानकरी. मारुती विश्वासराव – मुंबई, रोहिदास लोखंडे – मुंबई, किशोर गायकवाड – मुंबई. दिवाळी अंक  2019  चे मानकरी : प्रथम क्रमांक – आहुति दिवाळी अंक, संपादक गिरीश त्रिवेदी, अंबरनाथ;  द्वितीय क्रमांक – खतरनाक दिवाळी अंक सोनल खानोलकर, मुंबई.  तृतीय क्रमांक – कलामंच दिवाळी अंक हेमांगी नेरकर, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!