आ.जिग्नेश मेवानींना वसईतून विरोध ; विराट हिंदुस्थानची पोलीसांकडे तक्रार

वसई (प्रतिनिधी) :  जातीयवादी,देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या आमदार जिग्नेश मेवानी यांना वसईत भाषण करण्यास बंदी घालण्याची मागणी विराट हिंदुस्थान संगम ने माणिकपुर पोलीसांकडे केली आहे.

एमएमआरडीए आराखडा,बुलेट ट्रेन,सागरी महामार्ग,मुंबई-वडोदरा ए्सप्रेसवे,वाढवण बंदर समुद्र किनारे व्यवस्थापन,यांना विरोध करण्यासाठी वसईतून पर्यावरण संवर्धन समितीद्वारे आंदोलन करण्यात येत आहे.या समितीचे समन्वयक समीर वर्तक यांच्या पुढाकाराने या आंदोलनात भुमिसेनेचे अध्यक्ष काळुराम धोदडे,फादर दिब्रिटो,जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभु सहभागी झाले आहेत.हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी 28 डिसेंबरला वसईत सायंकाळी 4 वाजता पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात वक्ते म्हणून आमदार जिग्नेश मेवानी यांना आमंत्रीत करण्यात आले आहे.

मात्र,मेवानी यांना या कार्यक्रमात भाषण करण्यास देवु नये अशी तक्रार विराट हिंदुस्थान संगम या संस्थेने माणिकपुर पोलीस ठाण्यात केली आहे.पर्यावरण संवर्धनाचा आणि आमदार मेवानीचा काहीही संबंध नाही.जातीयवादी वक्तव्य करणे देशद्रोही गरळ ओकण्याकडे त्यांचा कल असतो

त्यांच्या या कृत्यामुळे त्यांना राजस्थानात विरोध करण्यात आला होता.तसेत पुण्यात पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदवण्यात आला होता.वसईतही ते जातीयवादी वक्तव्य करून ते जातीय तेढ निमार्ण करतील,त्यामुळे त्यांना पर्यावरण मेळाव्यात बोलण्यास मज्जाव करण्यात यावा.अशी तक्रार आम्ही केली आहे.जागरुक नागरिकांनीही पोलीस ठाण्यात तशा तक्रारी नोंदवाव्यात.असे आवाहन विराट हिंदुस्थानचे उत्तर मुंबई अध्यक्ष राजीव हरसोरा यांनी केले आहे.

तर पर्यावरण संवर्धनासठी आमचे आंदोलन सुरु आहे.त्यात सर्वधर्मीय,पक्षीय लोक सहभागी झाले आहेत.आमदार मेवानीही आम्हाला या आंदोलनात मदत करताहेत.आणि मेळावा हा पर्यावरण संवर्धन संबंधीचा आहे.मेवानीही त्या संदर्भातच बोलणार आहेत.त्यामुळे कुणाची काही हरकत नसण्याचे कारण नाही.पोलीसांकडून विचारणा झाल्यावरही आमची हिच भुमिका होती.असे स्पष्टीकरण समीर वर्तक यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!