ई-लर्नींग आणि तंत्रज्ञानाधारित विविध शालेय उपक्रमांचा उद्घाटन सोहळा संपन्न

विरार (प्रतिनिधी) : वसई प्रगती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (अर्नाळा) या वसई तालुक्यातील अग्रेसर पतसंस्थेच्या धर्मादाय निधीतून तसेच आगरी समाज विकास शिक्षण निधीतून आगरी समाज विकास शिक्षण संस्था (वसई) या संस्थेस देण्यांत आलेल्या भक्कम देणगीच्या बळावर आगरी समाज विकास शिक्षण संस्था (वसई) यांनी शाळेमध्ये सुरु केलेल्या ई-लर्नींग सुविधा, सिसीटिव्ही प्रणाली, शिक्षक ध्वनीसंच (Microphone with Speaker) वाटप समारंभ, तसेच नुतन कार्यालय, संगणक कक्ष व स्टाफ रुम इ. विविध उपक्रमांचा उद्धाटन समारंभ, मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०१९ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पुरुषोत्तम भोईर व उपाध्यक्ष श्री.अशोक भास्कर पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.

सदर समारंभास संस्थेचे (अर्नाळा) सी.ई.ओ श्री.हितेश पाटील यांच्या समवेत संचालक श्री.संदीप वझे, श्री.विजय पाटील, श्री.हेमचंद्र किणी, श्री.भरत घरत, श्री. केसरीनाथ मानकर, सौ.सविता वायडा, सौ.मिन:ल म्हात्रे, सौ.मनिषा पाटील तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदन किणी, व सेक्रेटरी श्री. विजय किणी यांच्या समवेत शिक्षण संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व संचालक इ. मान्यवर उपस्थित होते.

या समारंभातून संस्थेने धमार्दाय निधीतून आगरी समाज विकास शिक्षण संस्थेस ई-लर्नींग प्रकल्पासाठी दिलेल्या देणगी रु.२५,००,०००/- तसेच आगरी समाज विकास निधीमधून विविध शालोपयोगी वस्तूंसाठी दिलेल्या देणगी रक्कम रु.९,००,०००/- मधून शाळेने निर्माण केलेल्या ई-लर्नींग सुविधा, सिसीटिव्ही प्रणाली, नुतन कार्यालय, संगणक कक्ष व स्टाफ रुम इ.विविध उपक्रमांचे उद्धाटन करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांना ध्वनीसंचाचे वाटप संचालकांच्या हस्ते केण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.सारिका म्हात्रे यांनी सी.सी.टी.व्ही व ऑडिओ-व्हीज्यूल कार्यप्रणाली दाखविली. ही संस्था सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवीत आहे. गतवर्षात आगरी समाज विकास शिक्षण संस्थेस रु. २५,००,०००/- तसेच श्री.जानकी राम न्यास या संस्थेस रु. ८,००,०००/- देणगी देण्यांत आली होती. त्याचप्रमाणे यावर्षी अर्नाळा हेल्थ ट्रस्टच्या श्री.महालक्ष्मी हॉस्पीटलमध्ये विविध वैद्यकिय उपकरणे खरेदीसाठी त्या संस्थेस रु. ३०,००,०००/- ची देणगी मंजूर करण्यांत आली आहे.

सदर समारंभात प्रास्ताविक करतांना आगरी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. मदन किणी यांनी वसई प्रगती पतसंस्था करीत असलेल्या सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याबददल त्यांचे अभिनंदन केले. वसई प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश भोईर यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत तसेच संस्था आयोजित करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच वसई प्रगती संस्था, शाळेच्या व सभासदांच्या पाठीशी उभी असल्याची नमूद करतांना शिक्षण संस्थेने जे काही उपक्रम यापूर्वी केलेले आहेत, त्यासाठी संस्थेने मदत केलेली असून यापुढेही करत राहील याची ग्वाही दिली. शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री.विजय किणी यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली व वसई प्रगती पतसंस्थेने दिलेल्या भरघोस देणगी बद्दल पदाधिकारी व संचालक मंडळाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: