उत्तर प्रदेश चे राज्यपाल राम नाईक यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया ; पेसमेकर बसविला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेश चे राज्यपाल राम नाईक हे आपल्या वार्षिक वैद्यकीय तपासणी साठी लखनौ येथील संजय गांधी स्नातकोत्तर आयुर्विज्ञान इस्पितळात गेले असता डॉक्टरांनी त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांच्याकडे चार दिवसाच्या रजेची अनुमती घेऊन रामभाऊ हे इस्पितळात दाखल झाले. त्यांच्या ह्रुदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, पेसमेकर बसविण्यात आला. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवरांनी इस्पितळात भेट देऊन रामभाऊंच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता रामभाऊंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पूर्वीप्रमाणेच आपल्या कामास सुरुवात करतील, असे रामभाऊंच्या कन्या विशाखा कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!