उमेळे शाळेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाांनी साजरा

वसई (वार्ताहर) : प्रजासत्ताक दिनाननमित्त जज. प. शाळा उमेळे, (तालुका वसई, जिल्हा पालघर) या शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. ३ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२० पर्यंत मुलींच्या शिक्षणअचे महत्व पटावे म्हणून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हे अभियान प्रभावी पणे राबवले गेले. या अमियानाअंर्तगत डॉ.सिसिलिया काव्हटार्ला यांनी जि.प.शाळा येथे निमंत्रित केले होते. एक सिध्दहस्त लेखिका, कवनयित्री,  बालभारती पाठयपुस्तक मंडळ सदस्या, अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या काव्हार्ला यांनी सोप्या भाषेत संवाद साधला आणि नकळत संस्काराचे बाळकडू मुलांना पाजले.

स्वत:ची ओळख करुन देताना वडिलांच्या नावासोबत आईचेही नाव लावावे हे मुलांना सांगितले.  पर्यावरणाविषयी जागृती निर्माण होण्यासाठी ‘राइट लाईव्हलीहूड’ या पर्यायी नोबेल पुरस्कार विजेती ग्रेट थनबर्ग या सोळा वर्षीय मुलीची  गोष्ट  सांगितली. यातून आपण सुध्दा पर्यावरण रक्षण करण्याचा संदेश मुलांना मिळाला. मुलांनी इंग्रजी भाषेतून काव्हार्ला यांची मुलाखात घेतली. सर्व प्रश्नांची उत्तरे कृतीतून, उदाहरणे/दाखले देत दिली. तसेच त्यांनी काही पुस्तके, मासिके मुलांना भेट दिली.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये वार्षिक परीक्षेत शाळेतून पहिली आलेली विद्यार्थिनी कुमारी अक्षरा रहीस खान हिला ध्वज फडकवण्याचा मान मिळाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त बहारदार संस्कृतिक कार्यक्रम समूह गीते, नाटिका, साहित्य, कवायत, मल्लखांब विद्यार्थी भाषणे अशा सर्वच कलाप्र कारात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ.शीतल गुरुनाथ वेलणकर व चौथीच्या विद्यार्थ्यांनी अस्मिता इंद्रो रोका, रिधिमा सदा यादव, दिव्या मंगेश सुर्वे यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नगरसेवक मनिष वर्तक, माजी नगरसेवक प्रवीण वर्तक, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशोक वर्तक, सदस्य हेमंत राऊत, नंदकुमार महाजन, माणिकपूर केंद्रीच्या केंद्रप्रमुख सौ.प्रिसिला अल्फ्रेड कोलासो, शाळेच्या शिक्षिका डॉलची डायस, वंदना राऊत शितल वेरळकर व शुभ दाभोई उपस्थित होत्या.

यावेळी विशेष अतिथी म्हणून सौ आणि श्री आयरीन सुनील जॉर्ज या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी शालेय उपयोगी २५,००० किंमतीचे साहित्या शाळेला भेड दिली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आणि शिक्षिका व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!