एका पुस्तक मित्र महाराष्ट्रीयन तरुणाची यशोगाथा

‘डॉ.सुनील दादा पाटील’ स्वयंअध्ययनातून उद्यमशीलता संस्कृतीचे प्रणेत

परदेशातील दिग्गज साहित्यिकांची पुस्तके आणि समग्र साहित्य ई-बुक किंवा ऑॅडिओ बुक स्वरूपात अनेक वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहेत. आपल्याकडे राज्य सरकारने अनेक दुर्मीळ मराठी ग्रंथांच्या बाबतीत तो प्रयोग राबवला आहे. अर्थात त्याचा आणखी विस्तार व्हायला हवा असला, तरी सद्यस्थितीत भरपूर चांगले साहित्य वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.’वाचणाऱ्यांनी वाचत जावे, त्यांना चांगल्या साहित्याची कमतरता भासणार नाही,’ अशी एकंदर परिस्थिती आहे.

जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात, व्याख्याने जातात आणि बरेच काही उपक्रम राबवले जातात. हे नक्कीच चांगले आहे; मात्र कोणत्याही अन्य विशेष दिवसाप्रमाणे पुस्तक दिन वर्षातून एकदाच साजरा करणे पुरेसे नाही. ज्याला आयुष्यात काही तरी प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकासाठी खरे तर रोजचा दिवसच पुस्तक दिन आणि वाचन दिन असला पाहिजे. पुस्तकांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. ते प्रत्येकालाच माहिती आहे; पण त्याची आठवण करून देण्याची वेळ मात्र अलीकडे बऱ्याचदा येते. कारण पुस्तकांची आर्थिक उलाढाल वाढली असली,तरी वाचनाचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे निरीक्षण अनेक तज्ज्ञ नोंदवतात.

पुस्तकांची उलाढाल जरी वाढली असली, तरी ती गांभीर्यानं वाचली जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे, असं म्हणायला वाव आहे. ‘पुस्तकं म्हणजे आपला खरा गुरू,’ ‘वाचन आपल्याला घडवत’ वगैरे सुविचार आपण लहानपणापासून वाचत/घोकत आलेलो असतो. ते अंमलात आणण्याचं प्रमाण मात्र घटलं आहे. काळानुरूप होणाऱ्या बदलांना विरोध करायचं कारण नाही किंवा सरसकट नव्याला नावं ठेवून जुनं तेच चांगलं होतं, असं म्हणण्याचा अजिबात हेतू नाही. समाजमाध्यमांमुळे अनेक चांगले बदलही समाजात होत आहेत; मात्र त्यांच्या आहारी किती जायचं आणि त्यांचा चांगला वापर कसा करायचा, हे आपल्याच हातात आहे.

तुम्ही-आम्ही सगळयांनी मिळून चांगलं काही तरी केलं, निदान जे कोणी काही वेगळं करू पाहतायत त्यांना साथ दिली, तरच वाचनसंस्कृतीची चळवळ फोफावू शकते. सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीसाठी ती चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. नुसती वाचाळता काय कामाची? आपण चांगलं काही तरी वाचलं, तरच भाषा वाचू शकते. पुस्तक दिनाच्या निमित्तानं त्याबद्दल आत्मपरीक्षण करू या!

माझ्या साहित्यीक आयुष्यात अनेक प्रकाशक, संपादक, साहित्यीक मान्यवरांशी माझा संबंध आला, पणसुनीलदादांच्या जीवनप्रवासाची कहाणी मनाला एक स्पर्श देऊन गेली. डॉ.सुनीलदादा पाटील यांच्या विषयी मलास्वयं अध्ययनातून उद्यमशीलता संस्कृतीचे प्रणेते असेच म्हणावेसे वाटते.डॉ.सुनीलदादा पाटील यांच्या बाबतीत माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले.

प्रश्न पहिला : इयत्ता चौथीमध्ये पाटी फुटली, मात्रनवीन पाटीपुन्हा कधीचनाही मिळाली..! काय भविष्य असावे त्या शेतकरी पुत्राचे ?

हातात टिकाव, फावडा घेऊन मजुरी करणे, नांगर घेऊन शेतमजुरी करणे. पण प्रत्यक्षात झाले काहीतरी वेगळेच. आज तोच शेतकरी पुत्रमहाराष्ट्र राज्यातील कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरया नामांकित प्रकाशनसंस्थेचा मालक आहे.आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा कार्यकारी संचालक आहेत.महाराष्ट्र राज्यातील नामांकित विक्रमवीर तर आहेच. पण’महाराष्ट्र  बुक ऑॅफ रेकोर्डस्’ या संस्थेचा प्रमुखसंपादक पण आहे. गरीबाच्या पोटी जन्माला येणेहा काहीगुन्हा नाही, पण गरिबीमुळे आयुष्यभर  रडत  राहणे हे चुकीचे असू शकते, हेच त्या शेतकरी पुत्राने गरीबीवर मात करून सिध्द करून दाखविले. वाचकांना गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढणारे युवा साहित्यीकराज धुदाट यांचेमी गरीब का आहे ? हे अद्भुत पुस्तक प्रकाशित करण्यामागे डॉ. सुनील दादा पाटील यांचा हेतूच असावा की जगातील गरिबांना आपल्या गरिबीची कारणे कळावीत म्हणजेच गरिबी दूर होईल.

प्रश्न दुसरा :  इयत्तापाचवीत डॉ. नंदकुमार नहार (मेहेकर, जिल्हा-बुलढाणा) यांच्याकडे कंपाऊंडरम्हणून नोकरीकरणाऱ्यायाशेतकरी पुत्राचेभविष्य काय असावे ?

तो मुलगा आयुष्यभर आई-वडील,  कुटुंबाची हलाखीची परिस्थिती, आपले नातेवाईक, पैपाहुणे, स्वत:चे नशिब यांच्या नावाने बोटे मोडीत बसला असेल.पण प्रत्यक्षात झाले काहीतरी वेगळेच… डॉ. नंदकुमारनहार प्रत्येकाला आपला कंपाऊंडर म्हणून नव्हे, तर आपला मुलगा म्हणून ओळख करून देतील, एवढेसद्वर्तणुकीचे कामकाज त्या शेतकरी पुत्राने केले आहे. मोठेपणी त्या शेतकरी पुत्राने एकाइंग्रजीमाध्यमाच्या शाळेतील ‘प्राचार्य’ पदावरील नोकरी सोडून आज स्वत:चे सामाजिक, आर्थिक, व्यावसायिकआणिसाहित्यिकसाम्राज्य उभे केले आहे.

लहानपणी शिकण्याच्या वयात कदाचित दुसरऱ्याकडे नोकरी करणे ही त्यावेळच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे मजबूरी असेल, पण मोठेपणी लाथ मारेन, तिथे पैसा काढेन हीच आपली खरी क्षमता असल्याचे त्या शेतकरी पुत्राने दाखवून दिले आहे.

प्रश्न तिसरा : शाळेत ज्याला पुरेशी पुस्तके मिळाली नाहीत, त्या शेतकरी पुत्राचे पुढील आयुष्यात पुस्तकांशी काय संबंध असावेत ?

त्यांनी कायमस्वरूपी पुस्तकांशी दुरावा करून घ्यावा, हा महाराष्ट्रीयन जनतेचा अनुभव आहेच. पण प्रत्यक्षात झाले काहीतरी वेगळेच. त्या शेतकरी पुत्राने वाचनालय, शाळा, महाविद्यालय, मित्रपरिवार यांच्या मदतीने पुस्तके उपलब्ध करून अहोरात्र वाचन केले. इतिहास विषयातील पी.एच.डी. प्राप्त केली. पण त्यासोबतच ज्यांना शाळेत सहजपणे सर्वकाही उपलब्ध होते, त्यांना नव्हे, तर शिकण्याची तळमळ असलेल्यांनाच विद्या प्राप्त होते. हा इतिहास जगासमोरमांडला. तब्बल १०,००० पेक्षा जास्तवैयक्तिकपुस्तकसंग्रह करून स्वत:चे घर पुस्तकांनी भरून टाकले आणि पुस्तकांचे आगळेवेगळे असे अनोखे घर निर्माणकेले एवढेच नाही तर आपला मुलगा ‘प्रिन्स पाटील’ याच्या वाढदिवसालाग्रंथतुला करून म्हणजेचत्याच्या वजनाइतकी पुस्तकेसातत्याने प्रत्येक वर्षीवाटप करून पुस्तकीय वाढदिवस साजरेकेले.

लिहू आनंदेया डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील संपादित ग्रंथातूनडॉ. सुनीलदादांनी नवसाहित्यीकांना लेखनासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रश्न चौथा : ज्याला फी दिली नाही म्हणून क्लासमध्ये बसू दिले नाही, तो शेतकरी पुत्र मोठेपणी काय करेल?

तो शेतकरी पुत्र शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक, अधिकारी,संस्थाचालक आणि इतर सर्व बांधवांचा द्वेष करीत समाजात फिरतअसेल. महाराष्ट्रीयन जनतेचा हा अनुभव आहेच.पण प्रत्यक्षात झाले काहीतरी वेगळेच. त्या शेतकरी पुत्रानेस्वत:च्या घरात लहान मुलांसाठी ‘चिल्ड्रेन्स लायब्ररी’ सुरु केली. तुरुंगातील कैदी बांधवांना हजारो भेट पुस्तके देऊन सामाजिक सलोखा जतन केला. अनेकमहाराष्ट्रीयनउपेक्षित विक्रमवीरांच्या  कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन दिले.

शिक्षणाचे, पुस्तक प्रेमाचे, वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचे प्रयत्न केले. कोणी वाईट वागणूक दिली म्हणून सूडबुध्दीने स्वत:दु:खी होण्या पेक्षा;ज्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला, त्यांच्या आठवणी काढून सदैव जगा पुढे इतरांना काहीना काही देण्यासाठी मदतीचा  हातच  पुढे केला. आज देवाने घेणाऱ्यांच्या नव्हे, तर देणाऱ्यांच्या यादीतमला बसविले आहे, याचा आनंद उपभोगत असल्याचे डॉ. सुनील दादा पाटील अत्यंत आनंदाने सर्वांना सांगत असतात.

प्रश्न पाचवा : आयुष्यात ज्याला संगणक, टायपिंग मशीन यांचे शिक्षण मिळाले नाही, त्याशेतकरी पुत्राच्या जीवनरूपी प्रवासात या साहित्याचा किती संबंध असावा?

माझ्या मते, काहीच संबंध नसावा. पण प्रत्यक्षात झाले काहीतरी वेगळेच. तोच शेतकरी पुत्र आज महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित प्रकाशनसंस्थेचाप्रमुख आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक विक्रमवीरांना ‘राष्ट्रीय विक्रमांचे अनेक प्रमाणपत्र’ त्या शेतकरी पुत्राच्या हस्ते देण्यात आलेलेआहेत. युवा कवयित्री शैनाजआशपाक मुल्ला(मुंबई)यांचा मराठीतीलरंग जीवनाचेहा कवितासंग्रह आणि सुहास दिनकर देशमुख(रायगड)यांचाइंग्रजीभाषेतीललाईफ विदाउट वाईफहाअत्यंतएकमहत्त्वपूर्ण लेखसंग्रहआणि अशा प्रकारची अनेक पुस्तकेहे ‘थ्री डी इफेक्ट’ मध्ये प्रकाशित करण्याचा मराठी साहित्यसृष्टीतील एक अभिनव प्रयोग डॉ. सुनीलदादांनी केलाआहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर,नागपूरयेथील प्रकाशनाच्या तोडीस तोड दर्जेदार पुस्तकनिर्मिती ग्रामीण भागांतून करण्याचे शिवधनुष्य डॉ. सुनीलदादांनी अत्यंत यशस्वीपणे पेललेले आहे. महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यातील लेखकांची 700 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी आजवर प्रसिध्द केलेली असून त्यांची प्रकाशनाची घोडदौड सातत्याने सुरूच आहे.

प्रश्न सहावा : एका गरीब शेतकरी कुटुंबातील भावंडांचे पुस्तक लेखनाशी काय नाते असावे ?

आज त्या शेतकरी कुटुंबातील भावंडांचीप्रत्येकाची स्वरचित पुस्तके आहेत. पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या-भूतकाळाच्या, एकेका क्षणांच्या जिंकल्याच्या-हरल्याच्या, प्रेमाच्या-कटुतेच्या…! पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे..!

डॉ. सुनील दादा पाटील हे राष्ट्रीय विक्रमवीर पुस्तक संग्राहक, विक्रमवीर प्रकाशक, विक्रमवीर पुस्तक देणगीदार आहेत. सौ.संजीवनी सुनील पाटील यांच्या प्रेरणादायी विचारया पुस्तकाच्या आतापर्यंत तब्बल चार आवृत्त्या प्रकाशित झाल्याअसून. महाराष्ट्र शासनाने सदर पुस्तक शासनमान्य पुस्तकांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. सौ. संजीवनीताईंनी आतापर्यंत तब्बल ६०० पेक्षा अधिक पुस्तकांचे मुद्रित शोधन केले असून लवकरच याचीही विश्वविक्रमी नोंद केली जाणार आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. सुनील दादा पाटील आणि सौ. संजीवनीताई यांनी पुस्तकसंग्रह, पुस्तकविक्रम, पुस्तकसंवर्धन, पुस्तकप्रकाशन आणि पुस्तकलेखन या पुस्तकाच्या बाबतीत केलेल्या सर्वांगीणप्रगतीचे पुस्तक खरोखरच ‘ए-वन ग्रेड’ सुध्दा कमी पडेल, इतके प्रशंसनीय आहे.

प्रश्न सातवा : एका महाराष्ट्रीय कुटुंबातील सात वर्षे वयाच्या बालकाचे शैक्षणिक, सामाजिक संगोपन कसे असावे ?

तीन-चार वर्षांचे झाल्याबरोबर आईवडील त्या बाळाला एखाद्या शैक्षणिक यंत्राप्रमाणे नर्सरी, पाळणाघर, बालवाडी येथे टाकून मोकळे होतील. आई-वडील बाळाची सर्व जबाबदारी त्या शैक्षणिक संस्थेवर सोपवून फक्त भरपूर गुणांची अपेक्षा करतील. पण प्रत्यक्षात झाले काहीतरीवेगळेच.आई-वडिलांनी त्या मुलाला घडविण्यासाठी पूर्णपणे वेळ दिला. आज एप्रिल २०१९ मध्ये सात वर्षे वयाच्या विद्यार्थी बालमित्राने ‘प्रिन्स’ नावाप्रमाणेचपोस्ट ऑॅफिस, बँकेतील व्यवहारकरणे, प्रकाशनाच्या कामात मदत करणे, शाळेतील मित्रांना मदत करणे, दस्तुरखुद्द माननीय राज्यपाल साहेबांशी संभाषण करणे या गोष्टी खरोखरच आश्चर्यचकीत करणाऱ्या वाटतात.

लहान मुलांचे भावविश्व समृध्द होण्यासाठी गरज असते ती वेगवेगळया गोष्टी त्यांना ऐकवण्याची. पूर्वी आजी-आजोबा आनंदाने करत असलेली ही गोष्ट आता ‘न्यूक्लिअर फॅमिली’ मुळे कमी झाली. त्यामुळे मातृभाषेतील गोष्टींच्या पुस्तकांची निकडआजअधिक प्रकर्षाने जाणवू लागलीआहे. प्रत्येक मुलाला वाचनाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. वाचनाची ही संकल्पना चिमुकल्यांमध्ये रुजण्यासाठी त्यांना विविध गोष्टी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांना समजतील, रुचतील, पटतील अशा त्यांच्या भोवताली असणाऱ्याअसंख्य गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम झाले पाहिजे आणि तेही त्यांच्या मातृभाषेत.मुलांना आपल्या मातृभाषेतून वाचनसाहित्य खूप मोठया प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी तंत्रज्ञानरूपी मोठया ताकदीचा वापर ‘कवितासागर पब्लिशिंग हाऊस’ कडून केला जात आहे. कौटुंबिक ज्ञानपीठातील संस्काररूपी शिक्षण आजडॉ. सुनीलदादांनीआपल्या मुलाला दिलेलं आहे. टीव्ही पासून आपल्या मुलाला दूर ठेवण्यासाठी त्यांनी स्वत: आपल्या घरात टीव्ही ठेवलेला नाही. आणि अशा प्रकारे स्वत: टीव्ही पासून स्वत:ला अलिप्त ठेवणारे पालक अर्थात पाटील दांपत्य वंदनीय आहेत.

 माझ्या साहित्यिक आयुष्यात अनेक संपादक, साहित्यिक मान्यवरांची माझा संबंध आला… पण सुनीलदादांच्या जीवन प्रवासाची कहाणी मनाला एक स्पर्श करून गेली. डॉ. सुनील दादा पाटील यांना मला स्वयंअध्ययनातून  उद्यमशीलता संस्कृतीचे प्रणेते असेच म्हणावेसे वाटते.

डॉ. सुनील दादा पाटील, जयसिंगपूर (9975873569) यांच्या स्वयंअध्ययनातून उद्यमशीलता या जीवन प्रवासाच्या संस्कृतीचे मला जाणवलेले पंचसूत्री यशोमंत्र:

01. आयुष्यातील अनुभवांतून आपणकुठे कमी पडलो, ते स्वयंमुल्यमापनांतून समजून घेणे.

 02. स्वयंअध्ययनातून स्वउन्नतीचा मार्ग निवडणे.

 03. त्या स्वउन्नतीच्या मार्गक्रमणासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे.

 04. आपल्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्याचा विचार करून, मनात आकस धरून दु:खी होण्यापेक्षा, मदत करणाऱ्यांशी कृतज्ञतापूर्वक मैत्रीतून प्रगतीचा आनंद लुटणे.

 05. कोणत्याही स्वउन्नतीच्या मार्गात किती प्रवास करणे? कुठे थांबणे?याचे नियोजन आखून जीवनप्रवास करणे.

– अनिल तुकाराम शिनकर (मनमाड) aanilshinkar1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!