एम.पी.ए.सीतुन वसईच्या शितल गिरीने केली उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एच नवघर येथील .के.ब.हेडगेवार सार्वजनिक वाचनालयात अभ्यास करणारी वसई बाभोळा येथे राहणारीकुमारी शितल गिरी हि एमपीएससी हि एमपीएससीमधून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली तिचे माजी महापौर नारायण मानकर, उपमाहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, प्रभाग समिती सभापती वृन्देश पाटील, नागरसवेक कल्पेश मानकर,वाचनालयाचे ग्रंथपाल अमित मोदी यांनी अभिनंदन केले यावेळी व पुदीला वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शितलचे वडील भास्कर गिरी,आई सुशीला पवार व भाऊ उपस्थित होते. या अभ्यासक्रमाततिच्या सोबत विरार मनवेलपाडा येथील विद्यार्थी चेतन धनावडे हा देखील उत्तीर्ण झाला आहे त्याचेही अभिनंदन करण्यात आले.

वरील दोन्ही विद्यार्थी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. घरी अभ्यास करण्यासाठी पुरेशी जागा व वातावरण उपलब्ध नसल्यामुळे हे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी वसई विरार माहापालिकेच्याप्रभाग समिती एच येथील डॉ.के.ब.हेडगेवार वाचनालयाचा लाभ घेत होते वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके उपलब्ध करून दिली जात होती. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांनी वाचनालयाला प्रत्यक्ष भेट देऊन महानगरपालिका व वाचनालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.विविध क्षेत्रात आज संधी उपलब्ध असून त्याचा लाभ मुलांनी घेतला पाहिजे. एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी कडे देखील वळावे असे माजी महापौर नारायण मानकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!