एस.टी चालक देशात सर्वोत्तम – श्रीरंग बरगे

नालासोपारा (वार्ताहर) : ११ते २५ जानेवारी २०२० दरम्यान देशभर रस्ते सुरक्षा अभियान चालविण्यात येते त्या निमीत्ताने एस.टी.महामंडळ सुद्धा प्रतिवर्षी “सुरक्षितता मोहीम”राबवीत असून एस.टी चे नालासोपारा आगारातील १२ वर्षे अपघात विरहित सेवा देणारे एस.टी चे चालक अन्सार शेख यांचा वाढदिवस सुद्धा ११जानेवारी रोजी असतो. हा योगायोग साधून महाराष्ट्र एस.टी कर्मचारी, काँग्रेस, नालासोपारा आगार यूनिटच्या वतीने एका खास बैठकीचे आयोजन करून सारस्वत हॉल, नालासोपारा (प) येथील हॉलमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रम  साजरा करण्यात आला.
१२वर्षाच्या सेवेत अन्सार शेख यांच्याकडून एकही अपघात झाला नाही. या शिवाय एस.टी महामंडळाकडून त्यांना सुरक्षित  सेवेचा बिल्ला सुद्धा मिळाला आहे. तय बद्द्ल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला या वेळी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस श्रीरंग बरगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षितता अभियानाच्या निमित्ताने एसटी चालकांना सुरक्षिततेचे धडे दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने देशभरातील रस्ते वाहतुकीचे अवलोकन केले असता एस.टी. चा चालक प्रवाशांच्या सुरक्षिततेची धुरा  सांभाळणारा देवदूत आहे. त्यातही आपल्या एस.टी महामंडळात कार्यरत असलेले ३,५००० चालक देशातील सर्वोत्तम चालक पैकी एक आहेत प्रशिक्षण, तंदुरुस्ती, मनस्वास्थ्य व प्रवाशांची सुरक्षितता या चारसूत्रीवर काम करणारे आमचे चालक बंधू खर्‍या अर्थाने सुरक्षित वाहतुकीच्या अग्रस्थानी आहेत. देशभरातील प्रवासी वाहतूकी मध्ये सुरक्षित वाहन चालवणाऱ्या पद्धतीमध्ये एसटीच्या चालकांचा अनुभव प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती निश्चितच उजवी आहे. त्यामुळे दर किलोमीटर मागे एस.टीच्या चालकांचे अपघाताचे प्रमाण शून्य पॉईंट १७ टक्के इतके आहे. त्यातही या  अपघातात समोरील वाहनांची चुकी  असल्याने झालेल्या अपघाताचे प्रमाण ९०टक्के असल्याने एस.टीच्या चालक निश्चितच अपघात विरहित सेवा देण्याबद्दल अव्वलस्थानी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. चालकाच्या या प्रामाणिक प्रयत्नामुळेच प्रवाशांना सुरक्षित प्रवास म्हणजेच एस.टीचा प्रवास हाच विश्वास हि सार्थ भावना प्रबळ झाली आहे .भविष्यात सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली म्हणून एसटीच्या चालकाकडे पाहिले जाईल हे निश्चित मानता येईल.
महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वाहतुकीमधे अंदाजे ३५ हजार अपघात वर्षाला होतं असुन १२ते १५हजार जण या मध्ये म्रुत्युमुखी  पडतात. पण एकूण अपघाताच्या तुलनेत एस.टी च्या अपघाताचे प्रमाण खूपच कमी आहे. हि आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. दररोज ६५लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतुक करणारी एस.टी.हि महाराष्ट्राची लोकवाहीनी बनली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची हमी असल्याने एस.टी हाच प्रवासाचा एकमेव सर्वोत्तम पर्याय असल्याने प्रवाशांनी एस.टी नेच प्रवास करावा,” असे आवाहनही या वेळी बोलतांना बरगे यानी केले.
कार्यक्रमाला शिवसेना नालासोपारा शहर प्रमुख संतोष टेम्बवलकर, संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश पाटील, विभागीय सचिव कमलाकर जोशी, प्रादेशिक सचिव श्रीकांत आढाव, वसई कॉँग्रेस सेवादल अध्यक्ष रतन तिवारी, वसई ग्रामीणचे अमर मेहेर, मोतिराम धावडे, मकसूद मणीयार, जयश्री कंचकटले, विजय कोंडविलकर, राहुल घोबाळे, कैलास भोपटे यांच्यासह एस.टी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: