ऑनलाईन प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग निकाल जाहीर

वसई : उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ महाराष्ट्र अंतर्गत पालघर व महाराष्ट्र प्रांतातील मोडी लिपी संवर्धनासाठी सातत्याने विविध उपक्रम सुरु आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून जिज्ञासू अभ्यासकांसाठी व्हाट्सअप माध्यमातून ऑनलाईन मोडी लिपी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने अनॆक नवोदित अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, गृहिणींना घरबसल्या आपल्या सोयीप्रमाणे, वेळेप्रमाणे मोडी लिपी प्रशिक्षण घेण्याची अत्यंत महत्वाची संधी उपलब्ध झाली.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचा १ एप्रिल ते १ मे २०२० प्राथमिक अभ्यास वर्ग संपन्न झाला. यात एकूण २१ प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले होते. सदर व्हाट्सउप ऑनलाइन परीक्षा दिनांक ३ मे २०२० रविवार रोजी संपन्न झाली. सदर प्राथमिक प्रशिक्षण वर्ग एकूण ३० दिवसांचा असून सहभागी पैकी एकूण १५ प्रशिक्षणार्थीनी प्रगत प्रशिक्षण अत्यंत मेहनतीने व यशस्वीपणे पूर्ण केले. उत्तर कोकण मंडळाच्या प्रशिक्षण प्रतिनिधीनी सातत्याने प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

एप्रिल ते मे २०२० ऑनलाईन प्रगत प्रशिक्षण वर्गात श्री वामन मनोहर राणे यांनी ४२ गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादित केला व श्री अरुण विनायक धर्णे यांनी ४० गुण मिळवून द्वितीय क्रमांक संपादित केला. तसेच प्रतिक भास्कर भायदे, सुशांत तानाजी कुरणे, डॉ पदमावती अंबादास पवार, अभिषेक गोरक्षनाथ कोळी, धिरज भाऊराव निंबाळकर, कपिल बाळकृष्ण कुळकर्णी, सुजीत जनार्दन पाटील, सौ रेश्मा अमेय कामत, अमित अजित मोदी, मंगेश माधव पंडीत, वामन मनोहर राणे, ममता मोहन गांवकर, सौ विद्या सुहास आपटे, हर्षल पाटील यांनी प्रशिक्षण वर्गात उत्तीर्ण यश संपादन केले. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे मार्गदर्शक डॉ श्रीदत्त राऊत यांनी सदर प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन केले. प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात प्राथमिक अक्षर ओळख, र अक्षराचा वापर, स्वर व व्यंजने पद्धती, जोडाक्षरे, ओळख सराव, मोडी अंक, मोडी निबंध, मोडी लिपी उतारे इत्यादी विषयावर तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले. उत्तर कोकण मंडळ अंतर्गत सुरु करण्यात आलेले सदर प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्रभर पसंतीस प्राप्त झालेले असून येत्या काळात दर महिन्यात पुणे वसई पालघर मुंबई मधील उपलब्ध भागात सदर विद्यार्थी मित्रांचे एक दिवसीय विशेष प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील इतिहास संकलन व संशोधन हेतू सुरु करण्यात आलेले हे पर्व महाराष्ट्र प्रांतातील अनेक भागात  मार्गदर्शक ठरत आहे. सध्या देशभर लॉक डाऊन कालखंडात विविध क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, नोकरी, सामाजिक जबाबदारी यांत मोलाची कामगिरी व सहभाग नोंदवत आपल्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा सार्थ अभिमान असल्याचे मत मंडळ प्रतिनिधी दिव्या वराडकर यांनी व्यक्त केले. या योगदानाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात सक्रिय सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्तर कोकण मोडी लिपी मंडळ अंतर्गत ऑनलाइन विशेष सन्मान करण्यात आला. 

उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाच्या मुंबई विभाग प्रतिनिधी दिव्या वराडकर ताई यांच्या मते “प्राथमिक वर्ग प्रशिक्षण वर्गाचा एकूण कालावधी व विद्यार्थ्यांनी अत्यंत जिज्ञासूपणे, आनंदाने केलेला अभ्यास यामुळे मोडी लिपी संवर्धनासाठी विश्वास प्राप्त होत आहे. सदर प्राथमिक वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यापुढेही मंडळ उपक्रम अंतर्गत अधिक संशोधनपर सराव मार्गदर्शन करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!