औषधांची डिलीव्हरी न देणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्सवर कारवाई होणार

वसई (प्रतिनिधी ) अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडीकल स्टोअर्सना औषधांची डिलीव्हरी न करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर्सवर कारवाई करण्याचे संकेत वसई-विरार महापालिकेने दिले आहेत.

नालासोपाराच्या प्रभाग समिती ई अंतर्गत येणाऱ्या मेडीकल स्टोअर्स चालकांची तातडीची बैठक सहाय्यक आयुक्त संतोष मुने यांनी गुरुवारी सकाळी आयोजित केली होती.या बैठकित मुने यांनी त्यांना मार्गदर्शन केले.लॉकडाऊनच्या काळात मेडीकल स्टोअर्समध्ये येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते.त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून तुम्ही त्यांना सुरक्षीत अंतर ठेवण्याच्या सुचना वजा सक्ती करावी.असे मुने यांनी सांगितले.

तसेच मेडीकल चालकांच्या समस्याही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.तालु्यात शेकडो मेडीकल चालक आहेत.त्यांना डिस्ट्रीब्युटरकडून औषधे पाठवली जात नाहीत.त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी मेडीकल चालक स्वतः डिस्ट्रीब्युटर्सकडे जातात.परिणामी एकाचवेळी शेकडो मेडीकल चालकांच्या गाडया रस्त्यावर धावू लागतात.डिस्ट्रीब्युटरकडे शेकडोच्या संख्येने गर्दी होते.सुरक्षीत अंतर राखले जात नाही.अशी तक्रार यावेळी मेडीकल चालकांनी केली.त्यावर ही समस्या वरीष्ठ पातळीवर लवकरच सोडवली जाईल.डिलीव्हरी न करणाऱ्या डिस्ट्रब्युटर्सवर कार्यवाहीही केली जाईल.असे संकेत मुने यांनी यावेळी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!