कलम ४९८ ची दुसरी बाजू… – ऍड.यज्ञेश कदम

विवाह म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा , दोन व्यक्ती सामाजिक, भावनिक दृष्ट्या जवळ येतात आणि पती पत्नी असा एक नाजूक सुंदर नाते बनते .विवाहामुळे पती-पत्नीच नव्हे तर दोन परिवार देखील एकत्र येतात. पती पत्नीचे नाते आनंदाने फुलू लागते पुढे ते पती पत्नी न राहता आई बाबा होतात त्यांच्या एक स्वतःच एक छोट कुटुंब बनते . या विवाह मध्ये बऱ्याच वेळा चढ उतार येत असतात पती पत्नी मध्ये भांडण होतात तर कधी सासरच्या मंडळीं कडून हुंड्या साठी छळ केला जातो.
अशा वेळी IPC ४९८ A नुसार त्या महिलेची फिर्याद घेतली जाते त्या महिलेच्या पतीस व तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध विनाचौकशी अजामीन पात्र गुन्हा दाखल करून घेतला जातो. पुढे या सगळ्यांवर आरोप सिद्ध होई पर्यंत ते गुन्हेगार असो वा नसो त्यांच्यावर गुन्हेगार चा शिक्का बसतो ज्यामुळे त्यांना भयंकर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो .
मोठे अधिकारी, डॉक्टर ,इंजिनिअर ,शिक्षक या सारख्या पदावर असलेले व्यक्ती या ४९८ मध्ये अडकलेले दिसतात . तेंव्हा असे विचार येतात कि ही लोक सुशिक्षित चांगल्या पदावर नौकरी करतात चांगली पगार असताना सुद्धा हुंडा खरंच मागत असतील का? आणि मागत असतील तर का ? अशाच काही वाचनातून काही अनुभवलेल्या घटनेतून दिसून आले कि बऱ्याच वेळा फक्त इगो दुखावला गेल्यामुळे तसेच पतीस आणि सासरच्या लोकांना उगाच त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या कडून भरामसाठ रक्कम लाटण्यासाठी तसेच समाजात त्या लोकांची बदनामी करण्यासाठी अशी बोगस केसेस केल्या जातात. समाजात आपली बदनामी होऊ नये ४८९ सारख्या फौजदारी गुन्ह्या मध्ये अडकू नये म्हणून काही लोक कोर्टाबाहेरच आहे ती रक्कम मोजतात.
एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तिचा अधिकार डावलला गेला तर अनेक संस्था अनेक मदतीचे हात पुढे येतात. पण जेंव्हा अशा काही महिलांच्या अत्याचाराचे बळी पडणारे सासरचे मंडळी असतात त्यांसाठी का काही केलं जात नाही.? काही दिवसं पूर्वी फेसबुक वर एक व्हिडीओ वायलर झाला होता त्यात एक सून आपल्या सासूला मारत आहे ,तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सासऱ्याला सुज येई पर्यंत मारहाण करत आहे . हे व्हिडीओ आपण पाहतो कंमेंट करतो असं नको व्हायला हवं यासारख्या कमेंट केल्या जातात. या कंमेंट चा काय फायदा ? पत्नी पीडित, सून पीडितांच्या हक्कांसाठी, मदतीसाठी का कुणी आवाज उठवत नाही ?
स्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियां मुळे या IPC ४९८ A मुळे पुरुष सध्या अबला झाले आहे असे दृश्य दिसत आहे. जो पर्यंत पुरुषावर लावलेला खोटा आरोप जात नाही तो पर्यंत त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात या प्रक्रियेस ५ ते ७ वर्ष लागतात. आपल्या आयुष्यातील महतवाचे वेळ टेन्शन मध्ये घालवता तसेच पैसा सुद्धा गमावतात . तो पर्यंत तो व्यक्ती मानसिक दृष्ट्या फार खचून जातो त्याचा न्याय व्यवस्थेवरील काय त्याचा स्वतःवर व स्वतःच्या नातेवाईक , मित्र मंडळी वर सुद्धा विश्वास राहत नाही, आयुष्यात कुणी नवीन आले तरी त्यांच्या वर सुद्धा विश्वास ठेवायला अवघड जाते . काही वेळा नैराश्य येऊन तो व्यक्ती स्वतःच आयुष्य सुद्धा संपवयाला मागे पुढे बघत नाही.
अश्या वेळी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ नुसार कायद्या समोर स्त्री पुरुष सर्व सामान आहे. या विधाना बद्दल विचार येतो. महिला म्हणून मिळालेल्या हक्कांचा , अधिकाराचा गैर वापर करणाऱ्या महिलांना सुद्धा कठोर शासन व्हायला पाहिजे अशा वेळी महिला म्हणून तिला का झुकते माप द्यावे ?समता, सामानता कायद्या मध्ये दिसून येत नाही. ४९८ च्या नावाखाली होणारी लूटमार कुठे तरी थांबले पाहिजे, या साठी सुद्धा कायदा असायला हवाच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!