कल्याण च्या प्रथमेष डोळे यास ‘मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स अवॉर्ड’ !

‘मॉडेल युनायटेड नेशन्स’मध्ये मराठीचा झेंडा ; आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रभावी भाषण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  इंडोनेशियातील  नुसादुआ येथे झालेल्या ‘बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कल्याणचा विद्यार्थी प्रथमेश डोळे याने मराठीचा झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींकर उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल त्याला मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा प्रथमेश हा महाराष्ट्रातील एकमेक विद्यार्थी आहे.

इंडोनेशियातील इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क या संस्थेच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी  ‘युनायटेड नेशन्स’ च्या धर्तीकर  ‘एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ भरवण्यात येते. पाणी,  दहशतवाद, राजकारण, अर्थ, पर्यावरण, गरिबी, बेरोजगारी आदी विविध विषयांवर जागतिक पातळीकर तरुण अभ्यासक तयार व्हावेत हा त्यामागे उद्देश आहे. २२ ते २५ मार्च या दरम्यान बालीमधील नुसादुआ येथे झालेल्या परिषदेत विविध देशांमधील ४६९ विद्यार्थी सहभागी झाले होते .

या परिषदेत प्रथमेश डोळे याचाही समावेश होता. त्याला आय.एम.एफ (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) या क्षेत्रातील  ‘क्रिप्टो करन्सी इन सस्टेनेबल इकॉनॉमी’ हा विषय देण्यात आला होता. प्रथमेश याने अत्यंत प्रभावीपणे हा विषय मांडला. त्याच्या सादरीकरणाबद्दल मोस्ट आऊटस्टॅण्डिंग डेलीगेट्स पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र व ट्रॉफी असे त्याचे स्वरूप आहे. सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये सध्या तो कायद्याचे शिक्षण घेत असून शेवटच्या वर्षाला आहे. ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातून त्याने बीएची पदकी घेतली असून ऑलियन्स फ्रान्सिस या संस्थेतून फ्रेंच भाषेचीही पदवी मिळवली आहे.
भारत माता की जय’चा नारा घुमला
प्रमाणपत्र व ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप असून ‘इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क’चे अध्यक्ष मोहम्मद फरीझल व सेक्रेटरी जनरल अंगुरो पंडितो यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथमेश डोळे याने पुरस्कार घेतल्यानंतर खड्या आवाजात व्यासपीठावरूनच ‘भारत माता की जय’.. अशा घोषणा दिल्या तेव्हा सभागृहातील शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इंडोनेशियात मराठीचा झेंडा रोवल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!