काथ्या उदयोगावर आधारित एकदिवसीय जनजागृती कार्यक्रम संपन्न

विरार (प्रतिनिधी) : कॉयर बोर्ड भारत सरकार व आनंदधाम गौशाळ रायपाडा (विरार) यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या उदयोगावर आधारित एकदिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थितीत प्लास्टिकरूपी भस्मासूर पर्यावरणाला हानी पोचत आहे.त्यामुळे पृथ्वीवरील मानवप्राण्यासहित साऱ्याचे जीवनमान धोक्यात आले आहेत. प्लास्टिकच्या वापरावर काही प्रमाणात आळा बसण्यासाठी निसर्गाने दिलेल्या साधनसपंतीपासून व पर्यावरण पूरक अशा सातत्याने वापरात येणाऱ्या नारळ व त्याच्या झाडापासून काथ्याकाथ्यापासून दोरीकॉयरपीत व त्यापासून चे शेतीखत,पायपुसणी चटईकाथ्याच्या कुंडयाकाथ्याच्या कुंडयाकाथ्या चे बेडखुर्ची,खेळणीझाडू,आदी नित्य आपल्या जीवनातील आवश्यक वस्तू नारळ व झाडापासून बनविले जातात.

एखाद्या शुभ कार्याला सुरुवात करताना नारळ वाढून त्याचा शुभारंभ केला जातो. म्हणूनच त्याला श्रीफळ म्हटले जाते व नारळाच्या झाडापासून उपयुक्त वस्तू बनवित असल्याने त्यास कल्पवृक्ष म्हणून सम्बोधले जाते अशा ह्या कल्पतरूचा उपयोग करून गोरगरीब जनतेला त्यापासुन रोजगार मिळावा यासाठी व त्यापासून जनजागृती व्हावी ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कल्पवृक्ष पासून कोणकोणत्या वस्तू कशाप्रकारे बनवल्या जातात व त्यापासून मिळणाऱ्या रोजगाराविषय माहिती कॉयर बोर्ड महाराष्ट्र शासनाचे अधिकारी श्री राजेश कांदळगावकर यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली.

केरळ,कर्नाटक,तामिळनाडू ह्या दक्षिण भारतातील राज्यात नारलापासून बनविलेल्या वस्तूपासून फार मोठया प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.तसेच ह्या वस्तू परदेशात निर्यात करून आपल्या देशाला परदेशी चलनही मोठया प्रमाणात मिळत आहे महाराष्ट्राला 720 कि मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे . व येथील समुद्राच्या खाऱ्या वारामुळे ह्या कोकणपट्टीत नारळाच्या पिकाचे मोठया प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.परंतु नारळ फोडल्या नन्तर करवंटी व सोडण हे फेकून दिले जाते.त्या फेकून दिलेल्या सोडण व झाडापासून आपल्याला उपयुक्त अशा अनेक वस्तु बनविता येतील व त्या वस्तूपासून आपण कशा प्रकारचे व्यवसाय करू शकतो व ह्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल सरकार व बँकांकडून कशा प्रकारे उपलब्ध होईल ह्या विषयी माहिती व तयार केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी ह्याची महत्वाची माहिती कॉयर बोर्ड भारत सरकारचे अधिकारी श्रीनिवासन सर यांनी दिली.सदर,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदधाम गौशाळा च्या संचालिका परमपूज्य माताजी व सीतादेवी,टी देवीदास,दीपक पाटील,सुभाष म्हात्रे,जगन्नाथ म्हात्रे,चिराग चव्हाण आदी मान्यवर मंडळी यांचे योगदान लाभले ही गौशाळा 19वर्षांपासून कार्यरत असून येथे येणाऱ्या भाविकाना श्रध्दा व अंधश्रध्देतील फरकाविषयी जागृत केले जाते.तुम्ही केलेले कर्म ह्याच्यातच तुमच्या जीवनाचे यश-अपयश सामावलेले आहे त्यामुळे कर्म चांगली करत जा अशी विचारधारा येथे सांगितली जाते. ह्या ठिकाणी वयोवृध्द,आजारी व दूध न देणाऱ्या गायी सोडल्या जातात त्यांच्या आजारपणातील वैद्यकीय सेवा व त्यांचे पालनपोषण ट्रस्ट मार्फत केले जाते.आजूबाजूच्या गावातील आदिवासी पाडयातील गोरगरीबमोलमजुरी करण्याऱ्या लोकांना येथे भोजनदान दिले जाते आणि ह्याच ठिकाणी नारळापासून चे विविध वस्तू कशा प्रकारे तयार केले जातात याचे कौशल्य प्रशिक्षण केंद्र वर्ग दोन महिने कालावधी असून प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन देण्यात येईल.येथे प्रवेश घेण्यासाठी फोटोआधार कार्डव बँकेच्या पासबुकची सोबत घेऊन येणे.

अधिक माहिती साठी प्रशिक्षक महेशसर –  9422669370 , विकास चव्हाण – 9370688455, माताजी – 8208929577 ह्या ठिकाणी सम्पर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!